शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

पुस्तकांच्या पायरसीविरोधात प्रकाशक ठोठावणार मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयाचा दरवाजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 21:06 IST

पायरसीमुळे प्रकाशकांप्रमाणेच शासनाचेही नुकसान

ठळक मुद्देपुस्तकांच्या पीडीएफ कॉपी विकण्याचा बेकायदेशीर व्यवसायही मोठ्या प्रमाणात चलतीत मेहता पब्लिकेशनचा पुढाकार

पुणे : पुस्तकांची पीडीएफ प्रत शेअर करणे किंवा मागणी करणे, हा कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा असल्याचे प्रकाशक आणि जाणकारांकडून अनेकदा सांगण्यात आले आहे. मात्र, पुस्तकांच्या पीडीएफ कॉपी विकण्याचा बेकायदेशीर व्यवसायही मोठ्या प्रमाणात चलतीत आहे. याच पार्श्वभूमीवर पुस्तकांच्या पीडीएफ वितरित करणाऱ्या एका व्यक्तीवर मेहता पब्लिकेशनतर्फे बुधवारी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रकाशकांकडून आता थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार नोंदवली जाणार आहे.एका व्यक्तीकडून ‘मराठीतील पुस्तकांचा खजिना खरेदी करण्यासाठी २९९ रुपये या नंबरवर ऑनलाईन ट्रान्सफर करा, पेमेंट पूर्ण झाल्यावर स्क्रीनशॉट आणि तुमचा ईमेल आयडी, नाव, मोबाईल नंबर आणि शहराचे नाव पाठवा. ई बूकची लिंक तुम्हाला ईमेलवर ५ मिनिटांमध्ये पाठवली जाईल’, असा मेसेज व्हायरल केला जात आहे. यामध्ये ययाति, राधेय, मृत्यूंजय, एक होता कार्व्हर, श्यामची आई अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे.सुनील मेहता यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘संबंधित मेसेज मिळताच मी त्या क्रमांकावर फोन करुन विचारणा केली. पीडीएफ वितरित करणे हा गुन्हा असल्याचे मला माहीत नव्हते, मी या क्षेत्रात नवीन आहे. त्याला समज देऊन मी खडक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांकडूनही त्याला समज देण्यात आली. मात्र, त्या व्यक्तीने अजूनही हा प्रकार थांबवला असेल असे वाटत नाही. कारण, सर्व पुस्तकांच्या पीडीएफ त्याच्याकडे उपलब्ध आहेत. २९९ रुपयांमध्ये तो कोणासही पुस्तकांच्या प्रती पाठवू शकतो. अशा बेकायदेशीर व्यवसायावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.’-------------------------मी याबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवणार आहे. लॉकडाऊनमुळे सध्या पुस्तकांच्या पीडीएफ कॉपी ऑनलाईन वितररित केल्या जात आहेत. सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले की रस्त्यावर, फूटपाथवर पायरेटेड पुस्तकांची विक्री पुन्हा सुरु होईल. हे सगळे थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. यामुळे प्रकाशकांचे नुकसान आहेच; मात्र, इनकम टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटी याबाबतीत शासनाचेही नुकसान होत आहे. १०-२० टक्के पायरसीमुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढला तरी खूप मोठा फरक पडू शकेल.- सुनील मेहता, प्रकाशक

 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यState Governmentराज्य सरकारChief Ministerमुख्यमंत्रीAjit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदी