शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

सुधा मेनन लिखित ‘गिफ्टेड’ पुस्तकाला कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 8:46 PM

पुणे : पुण्यातील प्रसिध्द लेखिका सुधा मेननलिखित ‘गिफ्टेड’ या पुस्तकाच्या कन्नड आवृत्तीस मानाचा समजला जाणारा कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.'इंडिया इन्क्लूजन समिट'चे संस्थापक व्ही. आर. फिरोज यांनी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे, तर लेखक आर. मणिकांत आणि नतेश बाबू यांनी पुस्तकाचा कन्नड अनुवाद केला आहे.  

ठळक मुद्देअपंगत्व असूनही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर खंबीरपणे उभे राहून कठीण आव्हाने पेलणा-या व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा या पुस्तकात आहे. २०१३ मध्ये ‘गिफ्टेड’ हे पुस्तक लिहायला घेतले तेव्हा अपंग व्यक्तींबद्दलच्या पुस्तकास बाजारपेठ मिळेल का, अशा शंका काही जणांनी उपस्थित केल्या होत्या

पुणे : पुण्यातील प्रसिध्द लेखिका सुधा मेननलिखित ‘गिफ्टेड’ या पुस्तकाच्या कन्नड आवृत्तीस मानाचा समजला जाणारा कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.'इंडिया इन्क्लूजन समिट'चे संस्थापक व्ही. आर. फिरोज यांनी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे, तर लेखक आर. मणिकांत आणि नतेश बाबू यांनी पुस्तकाचा कन्नड अनुवाद केला आहे.  या पुरस्काराबद्दल बोलताना सुधा मेनन म्हणाल्या, अपंगत्व असूनही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर खंबीरपणे उभे राहून कठीण आव्हाने पेलणा-या व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा या पुस्तकात आहेत. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या अनुभवांचे कथन वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल.''आ  म्ही जेव्हा २०१३ मध्ये ‘गिफ्टेड’ हे पुस्तक लिहायला घेतले तेव्हा अपंग व्यक्तींबद्दलच्या पुस्तकास बाजारपेठ मिळेल का, अशा शंका काही जणांनी उपस्थित केल्या होत्या. मात्र केवळ काही महिन्यांतच हे राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम विक्रीच्या पुस्तकांपैकी एक बनले. आता ते बंगाली, मल्याळम आणि कन्नडमध्ये अनुवादित करण्यात आले आहे. याबरोबरच सध्या मराठी व तमिळ भाषेतही त्याचा अनुवाद केला जात आहे, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असल्याची भावना मेनन यांनी व्यक्त केली. ‘गिफ्टेड'साठी अपंग व्यक्तींच्या कथा जाणून घेण्यापूर्वी त्यांच्या जगण्याविषयी मला कोणतेही ज्ञान नव्हते. मात्र मुलाखती घेतल्यानंतर त्यांची सकारात्मकता आणि आपल्या ध्येयाबद्दलची बांधिलकी पाहायला मिळाली. त्यांच्यात असलेल्या क्षमता पाहून आम्ही थक्क झालो, असेही मेनन यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यKarnatakकर्नाटक