शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
3
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
5
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
7
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
8
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
9
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
10
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
11
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
12
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
13
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
14
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
15
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
16
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
17
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
18
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
19
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
20
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'

मुळशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 3:54 PM

दुसऱ्या दिवशी (ता.१ ऑक्टोबर) रोजी सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू केल्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विपुल याचा मृतदेह शोधण्यात यश आले.

पौड : मुळशी धरणात बुडालेल्या विपुल सक्सेना या तरुणाचा मृतदेह सापडला. विपुल सक्सेना (वय २९ वर्षे) व त्याचा मित्र हिमांशु चंदवानी हे दोघेजण ता.३० रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास मुळशी धरणात पोहण्यासाठी उतरले असताना विपुल पाण्यात बुडाला होता.

पौड पोलिसांनी तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक लोकांचे मदतीने तात्काळ शोध कार्य सुरु केले होते. दुसऱ्या दिवशी (ता.१ ऑक्टोबर) रोजी सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू केल्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विपुल याचा मृतदेह शोधण्यात यश आले.

या शोध मोहिमेत मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापनचे कार्यकर्ते प्रमोद बलकवडे व त्यांचे सहकारी अमित कोतवाल, शंकर वरपे, कैलास परदेशी, सागर जाबरे, निलेश कुसाळकर, कर्णिक शहा, पंढरीनाथ जोरी, नामदेव गुंजाळ, विनायक जोरी यांनी विपुलचा शोध घेण्यासाठी परिश्रम घेतले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पौड पोलिसांनी कळविले आहे.

सहा महिन्यांतील 8 वी घटनामागील सहा माहिन्यात मुळशी तालुक्यातील धरण व अन्य जलसाठ्यात बुडून मरण्याची ही आठवी घटना आहे. तर एक घटना देवकुंड धबधब्यात घडली होती. यात बुडणारे हे बहुतेक तरुणच आहेत. व त्यातही धरणात बुडणाऱ्यांमध्ये परप्रांतीय तरुण अधिक आहेत. एप्रिल महिन्यात पिंपळोली -खांबोली येथील धरणात तीन शिबिरार्थी व अन्य एक असे चार जण बुडाले . तर त्यानंतर जुलै माहिन्यात एकजण वरसगाव धरणात, ऑगस्ट महिन्यात एकजण मुठा नदीपात्रात, सप्टेंबर महिन्यात बोतरवाडी दोघेजण स्थानिक तरुण येथील शेततळ्यात, एक जण मुळशी धरणात, तसेच अन्य एका घटनेत अंबडवेट येथील दोघेजण बुडाले होते.मागील आठवड्यात देवकुंड धबधब्यात दोघेजण बुडाले . या आठवड्यात मुळशी धरणात विपुलचा बळी गेला. 

मुळशी धरणाला टाटा कंपनीने धरणाच्या बाजूने जागोजागी सुरक्षा भिंती तसेच सुरक्षा रक्षक नियुक्त असले तरी या भागात फिरायला येणारे उत्साही तरुण चोरून धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरतात. अनेकांना येशील पाण्याची खोलीचा व प्रवाहाचा अंदाज नसल्याने अशा बुडण्याच्या घटना घडतात. यात शिक्षण व नोकरी निमित्ताने पुण्यात शिक्षणासाठी आलेले तरुण या भागात फिरायला आल्यानंतर असे जीवावर बेतणारे धाडस करतात आणि अपघात ओढवून घेतात. तरुणांना फिरायला जाताना घ्यावयाची काळजी यासंबंधीची माहिती त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी व महाविद्यालयांमध्ये देण्याची गरज असल्याचे मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख प्रमोद बलकवडे यांनी सांगितले.- प्रमोद बलकवडे, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख

टॅग्स :PuneपुणेDamधरण