शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

निमगाव केतकीत आढळला एकाचा मृतदेह, तपासात खून झाल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 12:32 IST

दारूच्या वादातून डोक्यात दगड मारून केला होता खून

ठळक मुद्देपोलिसांनी गुन्हा दाखल करून केली एकाला अटक

इंदापूर: निमगाव केतकीत व्याहळी रोडवरील महालक्ष्मी मंदीराजवळ २९ मार्चला सकाळी धोंडीबा नामदेव रूपनवर (वय६०) रा. दगडवाडी हे डोक्याला जखम झालेल्या मृृृृतावस्थेत पोलिसांना आढळून आले.  सुरूवातीला पोलीसांनी आकस्मात मृृृृत्युची नोंद पोलीस दप्तरी केली होती. नंतर पोस्टमार्टम रिपोर्ट आणि  घटनास्थळाच्या तपासावरून सदरची घटना आकस्मात मृत्यू नसून खुन झाल्याचे स्पष्ट झाले. इंदापूरपोलिसांनी या घटनेबाबत एकावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

याबाबत पोपट धोंडीराम रूपनवर (वय ३४) रा.दगडवाडी यांनी इंदापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. तर धनाजी विठ्ठल करे (वय ३८) रा.बराल वस्ती असे गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  ही घटना २८ मार्च रात्री १० ते २९ मार्च सकाळी ९:३० च्या दरम्यान निमगाव केतकी, व्याहळी रोडवरील महालक्ष्मी मंदीराजवळ घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

फिर्यादीत म्हटले आहे, धनाजी करे याने धोंडीराम रुपनवर यांना दारूच्या नशेत त्यांच्याशी वाद विवाद करून डोक्यात दगड मारून अथवा डोके दगडावर आपटून करून खुन केला. घटनास्थळी त्यांच्या डोक्याला जखम होउन रक्तस्राव झाला होता. तसेच अंगातील कपडे रक्ताने माखल्याने घटनेचे गांभिर्य वाढले होते. घटनास्थळी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर तपासत खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीIndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक