पुण्यातील कोंढवा परिसरात ओढ्यात आढळला मृतदेह; पावसात वाहून गेल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 12:10 IST2022-10-21T12:10:45+5:302022-10-21T12:10:52+5:30
काही वेळातच जवानांनी मृतदेह बाहेर काढला...

पुण्यातील कोंढवा परिसरात ओढ्यात आढळला मृतदेह; पावसात वाहून गेल्याची शक्यता
पुणे : शहरातील कोंढवा परिसरातील अर्चना परॅडाईज जवळील नाल्यामधे (ओढा) एका इसमाचा मृतदेह आढळलेला आहे. या मृतदेहाच्या अंगावर एका फूड डिलिव्हरी कंपनीचा टी शर्ट आहे. याबाबतची माहिती आज (ता. २१) सकाळी ०८:२१ वाजता अग्निशमन दलास मिळाली. त्यानंतर कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील वाहन रवाना करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच जवानांनी मृतदेह बाहेर काढला. हा व्यक्ती पावसात वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अग्निशमन दलातील जवानांनी त्या मृत इसमास पाण्याबाहेर काढून उपस्थित पोलिसांच्या ताब्यात दिले. याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. या कामगिरीत कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रांचे वाहनचालक योगेश जगताप व फायरमन तेजस खरीवले, अभिजित थळकर आणि मदतनीस अक्षय चव्हाण, अभिषेक कसबे, सतीश अरगडे यानी सहभाग घेतला.