पुणे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बुधवारी महारक्तदान शिबीर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 07:55 PM2021-09-20T19:55:24+5:302021-09-20T19:55:38+5:30

कोरोनासोबतच डेंग्यू,  मलेरियाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज वाढली - डाॅ.राजेश देशमुख

Blood donation camps will be organized by Pune district administration in all talukas of the district on Wednesday | पुणे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बुधवारी महारक्तदान शिबीर होणार

पुणे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बुधवारी महारक्तदान शिबीर होणार

googlenewsNext
ठळक मुद्देअजित पवारांनी येत्या कोरोना आढावा बैठकीत दिल्या होत्या रक्तदान शिबीर आयोजनाच्या सूचना

पुणे : दर वर्षी पावसाळा कमी होत असताना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात तापमानामध्ये वाढ होवून डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरियाचे रूग्ण संख्येत वाढ होते. या सर्व आजारांमध्ये रुग्णांना रक्ताची गरज वाढते. परंतु कोरोना महामारीमुळे रक्ताचा पुरवठा कमी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन, येत्या बुधवारी २२ तारखेला एकाच दिवसात संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात महारक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. 

जिल्ह्याच्या नुकत्याच झालेल्या कोरोना आढावा बैठकीत दर वर्षी सप्टेंबर,  ऑक्टोबर महिन्यांत डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरियाचे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे येत्या काळात जिल्ह्यासह राज्यात रक्ताच्या मागणीत वाढ होते. परंतु गेल्या दीड वर्षांत कोरोना महामारीमुळे रक्तदान शिबीरांचे प्रमाण कमी झाल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या कोरोना आढावा बैठकीत जिल्ह्यात रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या काही दिवसांत ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख (भापोसे), पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांचे संकल्पनेतुन सद्यस्थितीत पोलीस विभाग व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे.

पुणे जिल्हयामध्ये रक्तपेढयांमध्ये झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी सर्व तालुक्यांमध्ये एकाच दिवशी विशेष रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले.

Web Title: Blood donation camps will be organized by Pune district administration in all talukas of the district on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.