Blast At Bhavani Peth In Pune : पुण्यातील भवानी पेठेत स्फोट; संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 21:37 IST2022-06-12T21:28:55+5:302022-06-12T21:37:58+5:30
संबंधित संशयित व्यक्ती नेमकी कोण आहे? ती या फ्लॅटमध्ये काय करत होती? यासंदर्भात पोलीस संशयिताची कसून चौकशी करत आहेत.

Blast At Bhavani Peth In Pune : पुण्यातील भवानी पेठेत स्फोट; संशयित ताब्यात
पुण्यातील भवानी पेठमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील विशाल सोसायटीमध्ये एक संशयास्पद स्फोट झाला आहे. सोसायटीच्या बी विंग बिल्डींगमधील तिसऱ्या मजल्यावर वॉशिंग मशीनमध्ये हा किरकोळ स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, तसेच बीडीडीएसची टीम भवानी पेठमधील विशाल सोसायटीमध्ये दाखल झाली. ज्या फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला. त्या ठिकाणाहून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
पुण्यातील भवानी पेठेत स्फोट; संशयित ताब्यात#BlastAtBhavaniPethInPune#BlastInPunepic.twitter.com/VQrYL6guQO
— Lokmat (@lokmat) June 12, 2022
संबंधित संशयित व्यक्ती नेमकी कोण आहे? ती या फ्लॅटमध्ये काय करत होती? यासंदर्भात पोलीस संशयिताची कसून चौकशी करत आहेत.