शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

काळविटांच्या जिवाला अपघाताचा धोका , वाढत्या नागरीकरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 6:59 PM

पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या नान्नज, करमाळा आणि रेहकुरी येथे अनुक्रमे २५० ते ३०० च्या आसपास व ५०० काळविटे आढळतात. माळढोक पक्षी आणि काळवीट यांचे एक खास वैशिष्ट्य आहे.

ठळक मुद्देमागील चार  वर्षात २७ काळवीट मृत्युमुखी वाहनचालकांनी जबाबदारीची जाणीव ठेवावी

पुणे : भरधाव जाणारी वाहने, बेदरकार वाहनचालक, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन...एकूणच कायदा-सुव्यवस्थेविषयीचा बेजबाबदारपणा काळविटांच्या जिवाशी खेळत आहे. वन्यजीव विभाग पुणेच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मागील ४ वर्षांत २७ काळविटे वाहन अपघातात मृत्यमुखी पडली आहेत. पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या  नान्नज, करमाळा आणि रेहकुरी येथे अनुक्रमे २५० ते ३००च्या आसपास व ५०० काळविटे आढळतात. माळढोक पक्षी आणि काळवीट यांचे एक खास वैशिष्ट्य आहे. या दोघांनाही गवताळ प्रदेश आवश्यक आहे. कमी पाण्याची आवश्यकता असल्याने ते सहजासहजी दिसतात. रानटी कुत्री, कोल्हे, लांडगे हे काळविटाचे नैसर्गिक शत्रू. पूर्वी जमिनीची सलगता असल्याने काळविटांचा वावर मोठ्या प्रमाणावर होता. आता तुकड्या-तुकड्यांत जमिनी शेतीसाठी उपयोगात आणल्यानंतर प्राण्यांचा वावर कमी झाला. जिथे माळढोक पक्षी, तिथे काळवीट आढळ्त असल्याची माहिती वनसंरक्षक वानखेडे यांनी दिली. दोघांनाही झुडपे, जंगल, पाणवठ्याची जागा आवडतात. काळविटाला ओरडता येत नसल्याने तो बºयाचदा आपल्यावरील संकटाची सूचना उंच उड्या मारून देतो. यामुळे इतर पक्षी व प्राणी सतर्क होतात. काळविटाला लांबचे दिसत असल्याने तो पळून जाऊन आपले संरक्षण करू शकतो. वाढते नागरीकरण, वाहनांची संख्या, बेजबाबदार वाहनचालक, भरधाव वाहने यामुळे काळविटे अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहिल्यास त्यात २०१३-१४ या काळात २, २०१४-१५ मध्ये ६, २०१५-१६मध्ये १५, २०१६-१७ मध्ये ४ काळविटे वाहन अपघातात मृत्युमुखी पडली. राज्यात नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील रेहकुरी, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि नान्नज येथे काळविटे मोठ्या प्रमाणावर आढळतात. ही तिन्ही अभयारण्ये पुणे वन्यजीव विभागांतर्गत येतात. 

................

* वाहनचालकांनी जबाबदारीची जाणीव ठेवावीउगीचच वेगाने वाहन चालविण्यापेक्षा संतुलित वेगाने वाहन चालविणे गरजेचे आहे. आपल्या चुकीमुळे निष्पाप वन्यप्राणी मरत असतील, तर दोष कुणाचा? प्राण्यांवर विसंबून राहण्यापेक्षा वाहनचालकांनी जबाबदारीने वाहन चालवावे. बºयाच अपघातांचे कारण पाहिल्यास ते वाहनांचा वाढता वेग असल्याचे दिसून येईल. - रवींद्र वानखेडे (वनसंरक्षक वन्यजीव विभाग, पुणे) 

* कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. नागरिक, वाहनचालक यांनी वन्यजीवांविषयीच्या कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. वन्यजीव  कायद्यातील तरतुदी कठोर असून नागरिकांनी होणाºया शिक्षेचा विचार करावा. नियमांचा आदर राखल्यास निसर्ग, प्राणी आणि आपण यांच्यात संवाद राखण्यास मदत होईल. - रंगनाथ नाईकडे (वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग, पुणे)  

टॅग्स :PuneपुणेforestजंगलAccidentअपघात