शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अंधारी आल्यानेच विरोधकांचे काळे वर्ष : मुक्ता टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:03 IST

पुणे महापालिकेतील अनेक वर्षांची सत्ता गेल्यामुळे विरोधकांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली आहे.

ठळक मुद्देवर्षपुर्तीनिमित्त भाजपाचा कामकाजाचा आढावायोगेश मुळीक : आगामी वर्षात सर्व योजना पुर्ण करण्याकडे लक्ष देणार

पुणे : अनेक वर्षांची सत्ता गेल्यामुळे विरोधकांच्या डोळ्यापुढे अंधारी आली आहे. वर्ष पुर्ण झाले तरी ती गेलेली नाही. त्यामुळेच ते काळे वर्ष साजरे करत आहेत अशी टीका महापौर मुक्ता टिळक यांनी केली. महापालिकेतील वर्षभराच्या सत्ताकाळात मागील पंधरा वर्षात झाली नाहीत तेवढी मोठी व महत्वाची कामे झाली आहे, असा दावा त्यांनी केला. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापालिकेत १५ मार्च २०१७ रोजी महापालिकेतील महापौर व अन्य सत्तापदे भारतीय जनता पार्टीने ग्रहण केली. त्याच्या वर्षपुर्तीनिमित्त महापालिकेत महापौरांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, मंजूषा नागपुरे आदी यावेळी उपस्थित होते. सर्वच पदाधिकाºयांनी वर्षभरातील विविध कामे सांगितली व गोगावले यांनी पक्षाचे वर्षभरातले काम उत्तम असल्याचे प्रमाणपत्र दिले.महापौरांनी मेट्रो, २४ तास पाणी योजना, नदीकाठ संवर्धन योजना, नदीसुधार योजना आदीविषयी महापौरांनी सांगितले. मुरलीधर मोहोळ यांनी मिळकतकर देणाऱ्या कुटुंबप्रमुखासाठीची अपघात विमा योजना, वैद्यकीय तसेच परिचारिका महाविद्यालय या योजनांचा आढावा घेतला. सर्व मोठ्या योजनांचे काम सुरू असून त्यातील काही पुर्णत्वाला येत असल्याचे ते म्हणाले. भिमाले यांनी मिळकत कर विभागाचे उत्पन्न जीआयएस यंत्रणेमुळे वाढले असल्याचा दावा केला. कॅन्सरमुक्त पुणे, लहूजी वस्ताद स्मारक, शिवसृष्टी या योजनांची माहिती त्यांनी दिली. योगेश मुळीक यांनी आगामी वर्षात सर्व योजना पुर्ण करण्याकडे लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले. शहराध्यक्ष गोगावले यांनी पक्षाचे काम महापालिकेत जाहिरनाम्यानुसार सुरू असल्याचे सांगितले. वाहनतळ धोरण प्रशासनाने आणले आहे, त्याला आम्ही अनेक सुचना केल्या आहेत. दर वाढणार नाहीत असा दिलासा त्यांनी दिलाय दुमजली पार्किंगचा तसेच दुचाकींना सवलत देण्याचा पर्याय दिला आहे असे ते म्हणाले. पक्षाच्या अमलबजावणी समितीने सुधारणा करून दिलेल्या योजनाच पदाधिकारी पुढे आणतात, त्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन त्या मंजूर होतात. याच पद्धतीने आगामी ४ वर्षात कामे सुरू राहील असे गोगावले यांनी सांगितले...शिवसृष्टी बीडीपीत होणार आहे. त्याच नव्हे तर संपुर्ण शहराच्या बीडीपी धोरणाविषयी पक्षनेत्यांची बैठक आयोजित केली आहे. आमदार, खासदार यांनाही त्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. त्यात चर्चा होईल व नंतर मुख्यमंत्र्यांना त्याबाबत माहिती देण्यात येईल. या महत्वाच्या विषयावर त्यानंतरच निर्णय होईल असे भिमाले यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळकBJPभाजपाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीcongressकाँग्रेस