शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती सिलिंडरचा काळाबाजार, चौघांच्या जेजुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 10:51 IST

चार तरुण विनापरवाना बेकायदेशीरपणे घरगुती गॅसच्या टाकीमधून व्यावसायिक टाकीमध्ये मशिनद्वारे इंधन गॅस हस्तांतरित करून विक्री करत होते

जेजुरी : घरगुती गॅस वापराच्या सिलिंडरमधून मशिनच्या साहाय्याने व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस हस्तांतरित करून या टाक्या काळ्या बाजाराने विकणाऱ्या टोळीचा जेजुरीपोलिसांनी पर्दाफाश करत मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये २६७ गॅस सिलिंडर, गॅस हस्तांतरित करण्याचे मशिन, वजनकाटे व एक चारचाकी वाहन असा सुमारे १२ लक्ष ६४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पुरंदर तालुका पुरवठा निरीक्षक अश्विनी चंद्रकांत वायसे यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील गुळुंचे -कर्नलवाडी हद्दीतील सत्यवान जगन्नाथ निगडे यांच्या बंद असलेल्या पोल्ट्री शेडमध्ये अत्यंत धोकादायक रीतीने मानवी जीवन धोक्यात येईल, अशा पद्धतीने चार तरुण विनापरवाना बेकायदेशीरपणे घरगुती गॅसच्या टाकीमधून व्यावसायिक टाकीमध्ये मशिनद्वारे इंधन गॅस हस्तांतरित करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार अचानक धाड टाकून मुद्देमालासह मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. यामध्ये पांडुरंग चंद्रकांत गोफणे, अभिजित दत्तात्रय बरकडे (दोघे रा. मोराळवाडी, ता. बारामती), विश्वजित बाजीराव यमगर (रा. पिरोळे, ता. माळशिरस, जि.सोलापूर), तुकाराम चंद्रकांत खताळ (रा. कापसी, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, चंद्रकांत झेंडे, हवालदार दशरथ बनसोडे, विठ्ठल कदम, अण्णासाहेब देशमुख, संदीप भापकर यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रJejuriजेजुरीCylinderगॅस सिलेंडरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस