शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 10:37 IST

पंधरापैकी ११ भाजप, ३ राष्ट्रवादी तर एक अध्यक्षपद काँग्रेसकडे 

पुणे : पुणे महापालिकेच्या १५ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. एकूण १५ प्रभाग समिती अध्यक्षांपैकी ११ जागा भाजपच्या वाट्याला आल्या असून, यातील ५ जागांची निवडणुक बिनविरोधच झाली होती. उर्वरित जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शुक्रवारी भाजपला ६, राष्ट्रवादी काँग्रेसला ३ तर काँग्रेसला एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे.

या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब भागडे पीठासीन अधिकारी होते. ही संपूर्ण निवडणुक प्रक्रिया शुक्रवारी स्थायी समिती सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. यात ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय प्रभाग समितीची निवड ही चिठ्ठी टाकून करण्यात आली. यामध्ये काँग्रेसच्या चाँदबी हाजी नदाफ या विजयी झाल्या. या प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचे सदस्य आहेत. त्यामुळे समान सदस्य असल्याने येथे चिठ्ठीव्दारे निवड करण्यात आली. 

इतर प्रभाग समिती व अध्यक्षपदाची नावे पुढील प्रमाणे : औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय : अर्चना मुसळे, बिनविरोध (भाजप), शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय : सोनाली लांडगे, बिनविरोध (भाजप),  सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय : अश्विनी पोकळे, बिनविरोध (भाजप), बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय : राजश्री शिळीमकर, बिनविरोध (भाजप), वानवडी रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय : हमीदा अनिस सुंडके, बिनविरोध (राष्ट्रवादी), कोंढवा - येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय : राणी भोसले, (भाजप), कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय : योगेश समेळ, (भाजप), येरवडा - कळस - धानोरी क्षेत्रिय कार्यालय : ऐश्वर्या जाधव, (भाजप), कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय : हर्षाली माथवड, (भाजप),  नगररोड - वडगांवशेरी क्षेत्रिय कार्यालय : संदीप जऱ्हाड, (भाजप), धनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय : स्मिता कोंढरे, (राष्ट्रवादी),  वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय : राजाभाऊ बराटे (भाजप), हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय : गणेश ढोरे, (राष्ट्रवादी), भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय : विजयालक्ष्मी हरिहर(भाजप).

---------------------------------

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस