शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पुण्यात भाजपच्या सर्वेक्षणाने ' हे ' विद्यमान आमदार आहे '' डेंजर झोन ''मध्ये ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 19:58 IST

नव्या चेहऱ्यांचा फार्म्युला विधानसभेलाही वापरला तर काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे...

ठळक मुद्देसर्वेक्षणात शिवाजीनगर, वडगाव शेरी तसेच कॅन्टोन्मेट या तीन मतदारसंघांचा त्यात समावेशइच्छुकांची मोर्चेबांधणी जोरात

पुणे: भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या आधी केलेल्या पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघ सर्वेक्षणामुळे काही ठिकाणचे विद्यमान आमदार धास्तावले आहेत. पक्षाने लोकसभा निवडणुकीत वापरलेला नव्या चेहऱ्यांचा फार्म्युला विधानसभेलाही वापरला तर काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मतदारसंघ मोकळा होण्याची शक्यता गृहीत धरुन संधी तेथील इच्छुकांनी जनसंपर्क, जाहीर कार्यक्रम यातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणूकीत विद्यमान आमदारांमध्ये गिरीश बापट यांना मताधिक्य मिळवून देण्याची चुरस लागली होती. विधानसभेची उमेदवारी बळकट करण्याचा हेतू त्यामागे होता. त्याआधी पक्षाच्या प्रदेश शाखेने केलेल्या सर्वेक्षणाच्या चर्चेचा संदर्भही यामागे होता. या सर्वेक्षणात तीन जागा ‘डेंजर झोन’मध्ये दाखवण्यात आल्याची चर्चा होती.  

शिवाजीनगर, वडगाव शेरी तसेच कॅन्टोन्मेट या तीन मतदारसंघांचा त्यात समावेश होता. प्रदेश शाखेकडून या ठिकाणच्या आमदारांना जनसंपर्क वाढवण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या, असे काही कार्यकर्ते खाजगीत सांगतात. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानंतर या चर्चेला पुन्हा जोर चढला आहे.लोकसभा निवडणूकीसाठी पक्षाने पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी न देता गिरीश बापट यांना दिली. शिरोळे यांना उमेदवारी न देण्यामागेही जनसंपर्कचा अभाव हेच कारण असल्याचे सांगण्यात येते. तोच निकष विधानसभेला लावला जाण्याची भीती पुण्यातील आमदारांमध्ये आहे.
पुण्यातील विधानसभेच्या सर्व म्हणजे कसबा, कोथरूड,  शिवाजीनगर, पर्वती, कॅन्टोन्मेट, वडगावशेरी या ६ पुणे लोकसभा मतदारसंघातील व खडकवासला आणि हडपसर या अनुक्रमे बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघातील २ अशा आठही जागा भाजपाच्या ताब्यात आहेत. पक्षाला पुणे शहरात प्रथमच असे यश मिळाले आहे. यातील एकही जागा हातची जाऊ नये यासाठी प्रदेश स्तरावरून काळजी घेण्यात येत आहे. वारंवार केले जाणारे सर्वेक्षण हा त्याचाच एक भाग असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.खासदार बापट प्रतिनिधित्व करत असलेला कसबा मतदारसंघ आता ते खासदार झाल्यामुळे मोकळा होणार आहे.
कॅन्टोन्मेटचे आमदार, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे  वादात तसेच आरोपांच्या गर्तेत सापडले आहेत. तोच प्रकार हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांच्या बाबतीत झाला आहे.  त्याशिवाय शिवाजीनगरचे आमदार विजय काळे दिसत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच या सर्वच ठिकाणच्या आमदारांनी लोकसभा निवडणूक प्रचारात कायम त्यांच्यासमोर राहण्याची काळजी घेतली होती. शिवाजीनगर, हडपसर, कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील पक्षाच्या दुसºया फळीतील कार्यकर्त्यांनी जनसपंर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे तिकीट मिळाले की निम्मी लढाई जिंकण्यात जमा असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नवे चेहरे मतदारांसमोर आणण्याचे पक्षाचे धोरण विद्यमान आमदारांमध्ये धास्ती आणि इच्छुकांचा हुरूप वाढवणारे ठरते आहे. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकgirish bapatगिरीष बापटMLAआमदार