शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे 'मिशन बारामती’ सुरू; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३ दिवस बारामती मुक्कामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 17:38 IST

बारामतीची जागा मिळविण्यासाठी भाजपचे मिशन सुरू...

-प्रशांत ननवरे

बारामती: देशातील लोकसभा निवडणुकांसाठी २०२४ उजाडण्याची वाट पहावी लागणार आहे. मात्र, भाजपने आत्तापासूनच ‘बारामती लोकसभा मतदार संघ’ टार्गेट केला आहे. भाजपने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तीन दिवस मुक्कामी येणार आहेत. भाजप लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी याबाबत माहिती दिली.

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करण्याचे संकेत भाजपने या दौऱ्याद्वारे दिल्याचे मानले जाते. २०१९ मध्येच लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सूचना केल्याची चर्चा होती. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांसह मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या. मात्र, बारामतीकरांनी भाजप उमेदवाराला नाकारले. त्यामुळे भाजप नेत्यांचे लोकसभा मतदारसंघावर विजय मिळविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. 

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मोडीत काढण्यासाठी भाजपने दंड थोपटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या तीन दिवशीय दौऱ्याला लोकसभा निवडणुकीची किनार आहे. सीतारामन यांच्यासमवेत दौऱ्यात विधानपरिषदेचे आमदार तसेच बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी राम शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित राहणार आहेत.

१६ ऑगस्ट रोजी केंंद्रीय अर्थमंत्री सीतारामन या खडकवासला, भोर येथे, १७ ऑगस्टला इंदापूर , दौंड, तर १८ ऑगस्टला त्या बारामती आणि पुरंदरला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. याठिकाणी भाजपच्या वतीने स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजप लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तसेच या पार्श्वभुमीवर सीतारामन यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट रोजी बारामतीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

...बारामती भाजप नेत्यांचे आतापासुनच ‘लक्ष्य’भाजपच्या विरोधात देशपातळीवर मोट बांधण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भुमिका महत्वाची ठरते. या पार्श्वभुमीवर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बारामतीत आतापासुन बारामतीत भाजप नेत्यांनी लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. यंदा प्रथमच खुद्द केंद्रीय मंत्री ३ दिवस मुक्काम करुन मतदारसंघात थांबणार आहेत. निवडणुक व्युहरचना आखण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांच्या सहभागातून आखण्यात येणारी रणनीती औत्सुक्याची ठरणार आहे. विधानपरिषद आमदार राम शिंदे यांनी लोकसभा प्रभारीपदी निवड करुन त्यांच्या मतदारसंघाची महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती