शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

पुण्यात भाजपाची भगवी लाट

By admin | Published: October 19, 2014 10:32 PM

भारतीय जनता पार्टीच्या लाटेमध्ये पुणे शहर भगवे होऊन गेले. भाजपाला लोकसभेपेक्षाही उज्ज्वल यश मिळाले असून, शहरातील आठही मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार निवडून आले

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या लाटेमध्ये पुणे शहर भगवे होऊन गेले. भाजपाला लोकसभेपेक्षाही उज्ज्वल यश मिळाले असून, शहरातील आठही मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. कॉँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन व राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका विद्यमान आमदाराला पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपाच्या तिन्ही विद्यमान आमदारांनी आपली जागा मोठ्या फरकाने राखण्यात यश मिळविले. पुण्यातील सर्वाधिक धक्कादायक पराभव विनायक निम्हण आणि रमेश बागवे यांचा मानला जात आहे. शिवाजीनगरमध्ये भाजपाचे विजय काळे यांनी निम्हण यांचा पराभव केला, तर माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी कॅन्टोन्मेंटमधून बागवे यांच्यावर मात केली. गेल्या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसला मिळालेली एकमेव वडगावशेरीची जागा टिकविता आली नाही. विद्यमान आमदार बापू पठारे यांचा भाजपाचे तरुण उमेदवार जगदीश मुळीक यांनी धक्कादायक पराभव केला. पठारे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. कॉँग्रेसच्या विद्यमान आमदारांविषयी नाराजी व्यक्त होत असताना भाजपाचे कसब्याचे आमदार गिरीश बापट, पर्वतीतून माधुरी मिसाळ आणि खडकवासल्यातून भीमराव तापकीर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. कोथरूडमधून मेधा कुलकर्णी यांनी विजय मिळविला. विद्यमान आमदार चंंद्रकांत मोकाटे यांना तेथे पराभव पत्करावा लागला. हडपसरमधून योगेश टिळेकर यांनीही विजयश्री खेचून आणली. शिवसेनेचे विद्यमान आमदार महादेव बाबर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. कॉँग्रेसचेही शहरात पूर्ण पानिपत झाले. शहराध्यक्ष अभय छाजेड पर्वतीतून चौथ्या क्रमांकावर गेले. वडगावशेरीतून माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांनाही चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. तर, हडपसरमधून माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. कोथरूडमधून उमेश कंधारे लढतीतही राहिले नाहीत. शहरातून सर्वाधिक सुमारे ७० हजार मतांनी भाजपच्या माधुरी मिसाळ निवडून आल्या. भाजपाचे सरकार आल्यावर मंत्रिपदाच्या शर्यतीत असणारे बापट यांचाही सलग पाचव्यांदा विजय झाला. त्यांनाही आजपर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य मिळाले. इंदापूरमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव कॉँग्रेससाठी धक्कादायक ठरला. येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय भरणे विजयी झाले. जिल्ह्यातून सर्वाधिक मतांनी विजय अजित पवार यांनी बारामतीतून मिळविला. चार महिन्यांत तीन वेळा पक्षांतर करणारे लक्ष्मण जगताप चिंचवडमधून विजयी झाले.(प्रतिनिधी)