शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'मिशन बारामती’ साठी भाजपच्या जोरदार हालचाली; 2 महिन्यांतच निर्मला सीतारामन यांचा दुसरा दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:51 IST

यंदा सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पुर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामती मुक्कामी येणार

बारामती : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ भाजप ने गांभीर्याने घेतल्याचे संकेत आहेत. भाजपच्या मिशन ‘बारामती लोकसभा’ जोरदार हालचाली आतापासुनच तयारी सुरु केली आहे. सप्टेंबरनंतर अवघ्या दोन महिन्यातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दुसऱ्यांदा  मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. यंदा सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पुर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामती मुक्कामी येणार आहेत.याबाबत भाजप लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी ‘लोकमत‘शी बोलताना माहिती दिली.

मोटे म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नोव्हेंबरच्या अखेरचा आठवडा किंवा डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दुसरा दौरा आयोजित केला आहे. त्याची पुर्वतयारी आतापासुनच सुुरु केली आहे. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामतीत ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी  मुक्कामी दौऱ्यावर येणार आहेत. ११ तारखेला खडकवासला, भोर, पुरंदर, जेजुरीवरुन पटेल हे बारामती येथे येणार आहेत. यावेळी पटेल यांच्यासमवेत  आमदार राम शिंदे, गणेश भेगडे, वासुदेव काळे आदी उपस्थित राहणार आहेत.

पटेल हे येथील सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील राष्ट्रवादीचे  सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात असलेल्या शेतकरी कृती समितीच्या प्रमुखांना भेटणार आहेत. यामध्ये पटेल सहकारतज्ञ चंद्रराव तावरे यांच्या सांगवी येथील निवासस्थानी मुक्कामी येणार आहेत. याचवेळी ते राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, माळेगांवचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, सतीश काकडे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर पटेल हे १२ नोव्हेंबर रोजी इंदापुर, भिगवण, दौंड येथे भेट देणार आहेत. त्यानंतर कौन्सिल हॉल पुणे येथे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे मोटे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणBaramatiबारामती