शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'शिवसेना आणि भाजपची युती होणार का?' काय म्हणाले चंद्रकांत पाटील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 16:57 IST

मागील दोन दिवसांपासून शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा माध्यमांत आहे...

पिंपरी : दोन भाऊ भांडले, दूर झाले. त्यानंतर ते एकत्रही येऊ शकतात. त्यामुळे राज्यात हिंदुत्त्ववाद्यांनी एकत्र यायला हवे. खऱ्या शिवसैनिकांत अस्वस्थता आहे. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी व्यक्त केले. पुन्हा युती होऊ शकते, यावर सुतावोच पाटील यांनी केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी पुढाकार घेतल्यास शिवसेनाभाजपाची पुन्हा युती होऊ शकते, असे मत शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी त्यांना पुन्हा शिवसेना-भाजपची युती होईल का? यावर विचारले. पाटील म्हणाले, ‘‘खऱ्या शिवसैनिकांना आघाडीचा निर्णय पटलेला नाही. त्यामुळे तानाजी सावंत, रामदास कदम आणि अब्दुल सत्तार यांनी युतीबाबत जाहिरपणे मत व्यक्त केले आहे. राजकाणात शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल सांगता येत नाही.’’

लॉकडाउन केले तर लोक रस्त्यावर उतरतील-लॉकडाउन विषयी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘कोरोनाचा विळखा वाढत आहे. आता लॉकडाऊन परवडणार नाही. दोन वर्षे विद्यार्थी, उद्योग, नोकरदार वर्गाने त्रास सहन केला आहे. लॉकडाऊन केला तर नागरीक रस्त्यावर उतरतील. कडक निर्बंध करायला हवेत. लग्नसोहळे, गर्दीचे कार्यक्रमावर निर्बंध आणावेत. मास्क वापरणार नाहीत. त्यांच्यावर पाचशे नाही तर पाच हजार दंड करायला हवा. निर्बंध कडक करायला हवेत. मात्र, दुर्बिन घेऊन बसू नये.’

अरेरावीमुळे बैठकांना जात नाही-जनजीवन सुरळीत चालावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. मंदिरे, शाळा बंद, बैलगाडा बंद अशो करून चालणार नाही, नियम पाळून सर्वकाही सुरू ठेवायला हवे. सरकारची अरेरावी चालते म्हणून की कोवीडविषयक बैठकांना जात नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील