शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

शिवसेनेवर दबावासाठी भाजपाची तयारी, युती न झाल्यास उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 2:49 AM

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीचा निर्णय न झाल्यास मावळात तयारी करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले.

लोणावळा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीचा निर्णय न झाल्यास मावळात तयारी करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. शिवसेनेच्या वाट्याला असतानाही केवळ दबाव आणण्यासाठी भाजपाकडून रणनीती आखली जात असल्याची चर्चा बैठकीनंतर सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील भाजपाचे पक्ष संघटन व कामकाजांचा आढावा घेण्यासाठी दानवे यांच्या अध्यक्षतेखाली मतदार संघातील तीन आमदार, प्रमुख पदाधिकारी व पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांची बैठक लोणावळ््यातील एका हॉटेलमध्ये बुधवारी झाली. या वेळी भाजपाचे राज्य संघटनमंत्री विजय पुराणिक, पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हा अध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर, देवेंद्र साटम, प्राधिकरण सभापती सदाशिव खाडे उपस्थित होते.मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीकरिता चाचपणी सुरू आहे. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ हा लक्षवेधी ठरणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला मावळ मतदार संघ असला तरी अद्याप युतीबाबत निर्णय झालेला नाही. या मतदार संघात भाजपाचे तीन आमदार असल्याने उमेदवार द्यायचा झाल्यास पक्ष संघटनेची स्थिती काय आहे. दानवे यांनी आढावा घेतला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९