शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 21:02 IST

उमेदवारी नाही मिळाली तर बंडखोरी करण्यासाठी इच्छुकांकडे अन्य पक्षांचे पर्यायही भरपूर आहेत

पुणे: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भारतीय जनता पक्षातच असणार आहे. लोकसभेपासून ते महापालिकापर्यंत (वर्ष २०१७), व्हाया विधानसभाही सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपने मोठे यश मिळवले आहे. इच्छुकांनी आतापासूनच आपापल्या नेत्यांकडे मनधरणी सुरू केली असून, नेत्यांमध्येही निकटच्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत. पक्षश्रेष्ठींपुढे या सगळ्यांचे समाधान करण्याचे आव्हान उभे राहणार आहे.

उद्धवसेनेच्या ५ माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश

विसर्जित महापालिकेत भाजपकडे ९८ नगरसेवक होते. वर्ष २०२२ मध्ये हे सभागृह विसर्जित झाले. त्यानंतर सव्वातीन वर्षे महापालिकेची निवडणूकच झालेली नाही. त्यामुळेच की काय, जे माजी नगरसेवक होते, त्यांनाही उमेदवारीसाठी स्पर्धा करावी लागणार आहे. मागील ३ वर्षांत त्यांच्याच प्रभागात स्पर्धा करणारे इच्छुक तयार झाले आहेत. त्याशिवाय ज्या जागांवर भाजपला अल्पमतांनी पराभव पत्करावा लागला, तेही यंदा नक्कीच बाजी मारू म्हणून तयारीत आहेत. अन्य पक्षांमधून भाजपत प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे. अलीकडेच शिवसेना (उद्धवसेना) पक्षातून एकदम ५ माजी नगरसेवकांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. आपापली जागा निश्चित राहावी, असा शब्द घेऊनच त्यांनी प्रवेश केला आहे.

उमेदवारी मिळवून देण्यासाठी आग्रही

लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले. महापौर, त्याआधी स्थायी समितीचे अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली आहेत. पक्षाचे संपूर्ण शहरातील नेते म्हणून स्थान मिळवण्याच्या तयारीत ते आहेत. त्यामुळे महापालिकेसाठी उमेदवारी देताना त्यांच्या शब्दाला वजन असणार आहे. दुसऱ्या राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी याही महापालिकेतूनच नगरसेवक, नंतर आमदार अशा पुढे आल्या आहेत. त्याही आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी आग्रही असणार आहेत.

आम्ही सांगू त्यांनाच उमदेवारी द्यावी

त्याशिवाय शहर हद्दीत येणाऱ्या ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघांत भाजपचेच आमदार आहेत. त्यातील पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. त्या स्वत: तसेच अन्य आमदार त्यांच्या समर्थकांना उमेदवारी मिळावी म्हणून आतापासूनच तयारीत आहेत. त्यांचे निकटचे कार्यकर्ते आतापासूनच त्यासाठी त्यांच्या मागे लागले आहेत. या समर्थकांना टाळणे किंवा शांत बसवणे मिसाळ व आमदारांना अवघड होईल. त्यामुळे त्यांचाही किमान आमच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही सांगू त्यांनाच उमदेवारी द्यावी, असा आग्रह असणार आहे.

 ५०० पेक्षा जास्त इच्छुकांची यादी तयार 

नव्याने प्रभागरचना झाल्यावर महापालिकेची नगरसेवक संख्या साधारण १६४ होईल. भाजपकडे आताच या सर्व जागांसाठी मिळून ५०० पेक्षा जास्त इच्छुकांची यादी तयार झाली आहे. त्यातच अन्य पक्षांमधून भाजपत प्रवेश करून उमेदवारी मिळवणाऱ्यांचाही समावेश आहे. उमेदवारी नाही मिळाली तर बंडखोरी करण्यासाठी इच्छुकांकडे अन्य पक्षांचे पर्यायही भरपूर आहेत. मात्र, अशी बंडखोरी झाली तर त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने बंडखोरी होऊ नये असाच नेत्यांचा प्रयत्न राहील, असे दिसते. त्यामुळेच सर्वांचे समाधान करण्याचे व समाधान होणार नाही त्यांना थांबवून ठेवण्याचे आव्हान भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे.

स्वबळ बरे, युती नकोच

इच्छुकांच्या या गर्दीमुळेच स्थानिक नेत्यांमध्ये आपण स्वबळावर लढू, असा विचार सुरू असल्याचे समजते. राज्य सरकारमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे पक्ष आहेत तर असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांचा भार कशासाठी घ्यायचा? निवडणूक निकालानंतर त्यांना बरोबर घ्यायचे किंवा नाही हे पाहता येईल, असे पक्षातील काही स्थानिक ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. पक्षश्रेष्ठींकडे ते एकत्रितपणे व्यक्त करण्याबाबत त्यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाElectionनिवडणूक 2024PoliticsराजकारणMahayutiमहायुतीBJPभाजपा