शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : राज ठाकरेंच्या भाषणाची दखल भाजपाला घ्यावी लागली - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 15:45 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची दखल सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागली आहे, असे सांगत अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची दखल सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागली आहे, असे सांगत अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

शिरूर मतदार संघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळ मतदार संघाचे उमेदावर पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, "राज ठाकरे सभा घेणार आहेत अशी ऐकीव माहिती आहे. आपल्या भाषणातून ते वस्तुस्थिती सांगत आहेत. त्यांची गुढीपाडव्याची सभा चर्चेत आहे. ते मोठा स्क्रिन लावतात आणि दाखले देऊन सभा घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी घेतली आहे.' 

महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढत आहे. आज पुण्यात 38 डिग्री तापमान आहे. दुपारी कदाचित 40 डिग्री  होईल. प्रत्येक उमेदवार, पक्ष कार्यकर्त्यांना उन्हाची काळजी घेवून कामे करावी लागणार आहेत. शरद पवार, नरेंद्र मोदी, राहुल गांधी आपापल्या परीने फिरत आहेत. मात्र, याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी एवढ्या सभा घेतल्या नव्हत्या. सध्या त्यांचा जनाधार मिळवण्याचा प्रयत्न आहे, असे सांगत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले. 

10 तारखेला नरेंद्र मोदींची बारामती सभा होती. ती आता पुढील टप्प्यात होणार असल्याचे समजते. विधानसभेवेळी त्यांची सभा झाली. तरी मला लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. मी पण काही अतिशयोक्ती करत नाही. मात्र प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

मावळमध्ये बेरोजगारी, अनेक जण बेरोजगार आहेत. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. मात्र सरकारने आश्वासन पाळले नाही. महाराष्ट्रावर कर्ज वाढत आहे. याशिवाय, देशातील महागाई कमी नाही, जीएसटी, नोटबंदी आणली. गरिबांकडे पैसे नाहीत, कॅशलेस व्यवहार सुरू होईल असे सांगितले होते. मात्र काहीही झाले नाही, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. 

दरम्यान, भाजपाच्या विरोधात राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. साहजिकच त्यांच्या या सभांचा फायदा आघाडीला होणार आहे. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांना गोंजारण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPuneपुणे