भाजपने जाहीरातबाजी करून शहर केले विद्रुपीकरण; शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 07:46 PM2024-03-19T19:46:35+5:302024-03-19T19:47:02+5:30

भाजपने अनेक भिंतींवर राजकीय जाहिरातबाजी करून शहराचे विद्रूपीकरण केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे....

BJP disfigured the city by campaigning; Shiv Sena's Thackeray faction alleges | भाजपने जाहीरातबाजी करून शहर केले विद्रुपीकरण; शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आरोप

भाजपने जाहीरातबाजी करून शहर केले विद्रुपीकरण; शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आरोप

पुणे :पुणे महापालिकेन शहर स्वच्छ सर्वेक्षण आणि जी २०च्या परिषदेसाठी पुणे महापालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील भिंती सुशोभीकरण केल्या होत्या; परंतु भाजपने अनेक भिंतींवर राजकीय जाहिरातबाजी करून शहराचे विद्रूपीकरण केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे.

देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. शहरात सर्रासपणे भाजपने निवडणूक चिन्ह, मोदींच्या घोषणा, भाजप नेत्यांची नावे भिंतींवर लावली आहेत यातून शहर विद्रूपीकरणात अजून हातभार लावला जात आहे. त्याबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाने पालिकेचे आयुक्त डॉ. राजेद्र भोसले यांना निवदेन दिले. यावेळी शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे , बाळासाहेब ओसवाल, अविनाश साळवे, विशाल धनवडे , पल्लवी जावळे, संगीता ठोसर, अनंत घरत, समीर तुपे , आनंद गोयल आदी उपस्थित होते.

Web Title: BJP disfigured the city by campaigning; Shiv Sena's Thackeray faction alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.