शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

Chandrakant Patil: पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 10:23 IST

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली

पुणे : पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात करून दाखवलं. असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यात रविवारी अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. 

पाटील म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले. 2019 मध्ये देखील 105 आमदार निवडून आले. देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पक्षालाही या महाराष्ट्रात 60 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही. देशात अनेक वर्ष राज्य केलेल्या काँग्रेसलाही 70 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले नाही. आणि नरेंद्र मोदींच्या नावावर मते मागून धोका देणाऱ्या शिवसेनेलाही 73 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बूथ संपर्क योजनेच्या जोरावर 100 हुन अधिक आमदार निवडून आले. 

हे बूथ संपर्क अभियान भारतीय जनता पक्ष पुण्यात अशा प्रकारे राबविली की संपूर्ण महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांना यामुळे दिशा मिळेल. महाराष्ट्रातील 98 हजार बूथवरील कार्यकर्ते 30 लाख कार्यकर्त्यांनी प्रत्येकी दहा लोकांची जरी मत मळवली तरी 3 करोड मतं भाजपला मिळतील. महाराष्ट्रात जेव्हा एखादा पक्ष दोन करोड मत घेतो तेव्हा तो 144 जागा जिंकतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही एकटे लढू, 160 जागा जिंकून आणू स्वतःच्या बळावर महाराष्ट्रात सरकार स्थापन करू असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीMLAआमदार