पिस्तुल साफ करताना सुटली गोळी : भाजपचे नगरसेवक गणेश बीडकर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 16:24 IST2018-12-27T16:09:10+5:302018-12-27T16:24:21+5:30
बंदूक साफ करताना चुकून गोळी सुटल्याने भाजपचे नगरसेवक गणेश बीडकर जखमी झाले आहेत .

पिस्तुल साफ करताना सुटली गोळी : भाजपचे नगरसेवक गणेश बीडकर जखमी
पुणे : पिस्तुल साफ करताना चुकून गोळी सुटल्याने भाजपचे नगरसेवक गणेश बीडकर जखमी झाले आहेत . या घटनेत बीडकर यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज (गुरुवार) सकाळी बीडकर स्वतःच्या घरात पिस्तुल साफ करत होते. त्यावेळी गोळी सुटून थेट त्यांच्या पायाला लागली आहे. जखमी बीडकर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बीडकर हे सध्या पुणे महापालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत. यापूर्वी त्यांनी महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपद तसेच भाजपचे गटनेतेपद भूषवले आहे. २०१७साली झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.