शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Gram Panchayat Result Pune: पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतरही भाजपचा उमेदवार पराभूत; राष्ट्रवादीच्या सीमा झांबरे प्रचंड मताधिक्याने विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 17:35 IST

सुरुवातीला चुरशीची वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी झाली

चंद्रकांत मांडेकर 

आंबेठाण : कोरेगाव खुर्द (ता.खेड) ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून सीमा राजू झांबरे यांची मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार आरती सुरेश काळे यांचा तब्बल २८८ मताने पराभव केला. पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मोठ्या लवाजम्यासह कोरेगाव येथे येऊन भाजपच्या समर्थक उमेदवार आरती काळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. तरी देखील काळे यांचा पराभव झाल्याने भाजपवर मोठी नामुष्की आली आहे. 

राज्याच्या मंत्र्याने ग्रामपंचायत पातळीवर येऊन प्रचार केल्याने येथील विरोधी गटाने नाराजी व्यक्त केली होती. सुरुवातीला चुरशीची वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी झाली. येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलांना राखीव होते. गावातील पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच होण्यासाठी काळे आरती सुरेश आणि झांबरे सीमा राजू यांच्यात सरळ सामना होता. यात काळे यांना ४३२ मते तर झांबरे यांना ७११ मते पडली.

वॉर्डनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे  * वॉर्ड क्रमांक एक ( तीन जागा ) - १) जाधव मिनल विनायक ( १५४ मते ). थोरात रंजना चिंधु ( ३८९ मते,विजयी ).  विद्या सतीश कडूसकर (३५५ मते,विजयी ) २) मेंगळे हॊना रामा ( बिनविरोध )* वॉर्ड क्रमांक दोन ( तीन जागा ) -१) गावडे कैलास तुकाराम ( १२१ मते ). मेंगळे रामदास रघुनाथ ( १७४ मते,विजयी ).२) गावडे सहिंद्रा राजाराम ( १९३ मते,विजयी ) मेंगळे सीताबाई ज्ञानेश्वर ( १०१ मते ).३) गाळव काळूराम नाना ( २३० मते, विजयी )जाधव विनायक धर्माजी ( ६३ मते )* वॉर्ड क्रमांक तीन ( तीन जागा ) -१) कडूसकर जया साहेबराव ( २३२ मते,विजयी ).कडूसकर पूनम विकास ( १४८ मते ).२) कडूसकर प्रविण विलास ( ८८ मते ).घनवट माधुरी सुनिल ( १२२ मते ). दोंद प्रकाश दत्तात्रय ( १७० मते, विजयी).३) मेंगळे जिजा भिवा ( बिनविरोध ). ''भाजपकडून या निवडणुकीत पालकमंत्री यांना बोलावून खालचे राजकारण केले आहे. ही निवडणूक गावपातळीवर होऊन द्यायला पाहिजे होती.मंत्री गावात येऊन प्रचार करून गेले हे गावकऱ्यांना रुचले नाही. त्यांनी मतदानातून आपला रोष व्यक्त केला. - राजू झांबरे ( माजी उपसरपंच )'' 

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकKhedखेडchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस