शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवस ठरला शेवटचा दिवस; दुचाकीस्वाराच्या अपघातात ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 19:08 IST

रविवारी चिमुकल्याचा वाढदिवस होता तोच त्याचा शेवटचा दिवस ठरला

बारामती : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वारामुळे आईसमवेत जाणाऱ्या एका चिमुकल्याचा रविवारी(दि ९) रात्री ९ च्या सुमारास अपघाती मृत्यु झाला. अरहत प्रमोद थोरात (वय ३,रा.मळद,ता.बारामती) असे या चिमुकल्याचे नाव आहे. रविवारी अरहतचा वाढदिवस होता. तोच त्याचा शेवटचा दिवस देखील ठरला आहे. या घटनेने थोरात कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शहर पोलिसांनी संकेत प्रकाश खळदकर (रा. नानगाव, ता. दौंड) या दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांत शुभांगी प्रकाश कांबळे (रा. सटवाजीनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली. अरहत याची आई प्रिती या फिर्यादीच्या भाची आहेत. अरहत याचा रविवारी वाढदिवस असल्याने ते कुटंबिय कांबळे यांच्याकडे आले होते.

रविवारी(दि. ९) रात्री साडे नऊच्या सुमारास ते मेळाव्यानिमित्त आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे आयोजित गाण्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी निघाले होते. फियार्दीच्या हाताला धरून अरहत हा चालत निघाला होता. यावेळी रस्त्यावर असणारे एक लोखंडी बॅरिकेटस ओलांडून ते पुढे जाताना  भरधाव वेगाने एक दुचाकीस्वार आला. दुचाकीला जोरदार धडक दिल्याने बॅरिकेटस उडून फिर्यादीच्या हाताला लागले. हाताला धरून चालणाऱ्या अरहत याच्या डोक्याला लागून तो उडून पडला. त्याच्या डोक्यातून रक्त येऊन तो गंभीर जखमी झाला. येथील इंदापूर रस्त्यावरील जय शिवम हॉटेलसमोर ही दुदैवी घटना घडली. 

अपघातानंतर देखील अरहत शुद्धीवर होता. कुटुंबियांनी त्याला तात्काळ बारामतीतील चार वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये नेल्याचे समजते. मात्र, अपघाताचे रुग्ण घेत नसल्याचे सांगत त्याला उपचारासाठी दाखल करण्यास सबंधित रुग्णालयांनी नकार दिल्याची माहिती मिळत आहे. येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यास उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी ऊशीर झाल्याचे सांगत त्यास मृत घोषित केले.

टॅग्स :BaramatiबारामतीAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल