शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत रिल्स बनवण्यासाठी दुचाकीस्वाराचा फूटपाथवर जीवघेणा स्टंट; पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 21:02 IST

या कारवाईत आत्ताच्या वाहतूक नियम उल्लंघनाबरोबरच यापूर्वी त्याच गाडीवर फूटपाथवर 'नो पार्किंगचा' जुना दंडही बाकी असल्याचे उघड झाले

बारामती : सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फूटपाथवरून भरधाव वेगात दुचाकी चालवत थरारक रील बनवणाऱ्या एका युवकावर बारामती वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगलाच धडा शिकवला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारवाईचे स्वागत होत आहे.     दि.२५ जुलै रोजी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक युवक दुचाकी फूटपाथवरून धावत नेत रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांचे जणू काही जीव धोक्यात घालून रील शूट करताना दिसत होता. व्हिडिओचा माग काढत बारामती वाहतूक शाखेने  (एम.एच ४२ बी.पी. ००९०) ही दुचाकी गाडी तात्काळ शोधून काढली. संबंधित युवकाची ओळख आदित्य जाधव (रा. बारामती) अशी पटली. वाहतूक शाखेने गाडी ताब्यात घेऊन (मोटार वाहन कायदा कलम २०७ नुसार) नोटीस बजावली. त्याचबरोबर सदर दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात अटकाव करण्यात आली होती. 

विशेष म्हणजे, या कारवाईत आत्ताच्या वाहतूक नियम उल्लंघनाबरोबरच यापूर्वी त्याच गाडीवर फूटपाथवर 'नो पार्किंगचा' जुना दंडही बाकी असल्याचे उघड झाले असून तोही वसूल करण्यात आला आहे. त्याबरोबर या चालकावर खटला तयार करून कोर्टात पाठविण्यात आला. अशा प्रकारे फूटपाथचा वापर चुकीच्या पद्धतीने करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव वाहतूक पोलीस जवान प्रदीप काळे अजिंक्य कदम प्रज्योत चव्हाण यांनी केली आहे. 

आम्ही कडक मोहीम हाती घेत आहोत शहरात वाहनांची वाढती संख्या पाहता कुणाच्याही जीवितास धोका होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे. फुटपाथ  पादचाऱ्यांना सुरक्षित ये-जा करता यावी यासाठी आहे तो हक्क स्टंटसाठी नाही. सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या रीलबाजांविरोधात आम्ही कडक मोहीम हाती घेत आहोत. -चंद्रशेखर यादव.

टॅग्स :BaramatiबारामतीbikeबाईकPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलTrafficवाहतूक कोंडी