शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

वाह प्रेमजी! दिलेल्या शब्दाला जागले; आयटी कंपनीला कोरोना हॉस्पिटल बनवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 14:16 IST

पुण्यामध्ये हे हॉस्पिटल उभारण्यात आले असून यामध्ये सार्वजनिक-खासगी सहकार्यातून उपचार करण्यात येणार आहेत.

पुणे: दानशुरपणात रतन टाटा, अझीम प्रेमजींचा हात कोणही धरू शकणार नाहीत. कोरोना युद्धात मदत करणाऱ्या जगभरातील हस्तींमध्ये प्रेमजींचा तिसरा नंबर लागतो. याच प्रेमजींना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिलेला शब्द खरा केला आहे. प्रेमजी यांनी भारतातील पहिले केवळ कोरोना विरोधात लढण्यासाठी हॉस्पिटल उभारले आहे.

पुण्यामध्ये हे हॉस्पिटल उभारण्यात आले असून यामध्ये सार्वजनिक-खासगी सहकार्यातून उपचार करण्यात येणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये 450 अद्ययावत बेड्स असणार असून 18 व्हेंटिलेटर आणि आयसीयू विभाग असणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गौरवोद्गार काढले असून विप्रो दोन सुसज्ज अॅम्बुलन्स पुरवित असल्याचे म्हटले आहे. तसेच कोरोनाचे हॉस्पिटल हे कोरोना हेल्थ सेंटर म्हणून ओळखले जाईल असे म्हटले आहे. हे हॉस्पिटल पुण्यातील हिंजवडी भागात तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी आयटी पार्क असून विप्रोची भलीमोठी आयटी कंपनीची इमारत आहे. यापैकी 1.8 लाख वर्गफूटाची जागा या हॉस्पिटलसाठी देण्यात आली आहे. 

५ मे रोजी विप्रोने राज्य सरकारसोबत सामंज्यस्य करार केला होता. यावेळी त्यांनी दीड महिन्यात कोरोनाशी लढायला हॉस्पिटल उभारणार असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी अझीम प्रेमजींचा मुलगा रिशद प्रेमजी याचे आभार मानले आहेत. गुरुवारी या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. 

 

कसे आहे हे हॉस्पिटल?450 खाटांचे हे विशेष रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल. गंभीर रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात १२ खाटा उपलब्ध असतील. हे  कोविड १९ साठी समर्पित असे स्वतंत्र कॉम्प्लेक्स असेल. येथे नियुक्त केलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या विशेष संकुलात २४ उत्तम खोल्यांची व्यवस्थाही असेल.

कोरोना संकटाशी लढण्यासाठी मुक्तहस्ते मदतविप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन ने कोविड १९ विरुद्ध लढतांना या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत ११२५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. कोरोना विषाणुचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव रोखण्यासाठी मदतीच्या रुपाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या संसाधनांचा नक्कीच उपयोग होईल व त्याद्वारे वैद्यकीय क्षेत्र सक्षम होण्यास देखील मदत मिळेल. सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणाऱ्या विप्रो आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशनने मुंबई,  पुणे,  औरंगाबाद वाळूज,  अमळनेर,  अहमदनगर,  अकोला, बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली या  जिल्ह्यांसह देशभरात मदत कार्य केले असून शासनाच्या बरोबरीने कोविड १९ विषाणु विरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत  देशातील 34 लाखाहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचली आहे.

करार कोणी केला?महाराष्ट्र शासनाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि विप्रो लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्लोबल हेड ऑपरेशन्सचे प्रमुख हरि प्रसाद हेडगे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

दानशूरपणात अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिसरा नंबरकोरोना व्हायरसच्या लढाईत रतन टाटा यांच्यानंतर देशाला मदत करणारे विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांनी जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे. कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यासाठी जगभरातील ८० अब्जाधिशांनी हात सैल केले आहेत. यात प्रेमजी देखील मागे राहिलेले नाहीत. अझीम प्रेमजी यांनी मदतनिधीसाठी खजिनाच ओतला आहे. यामुळे प्रेमजी हे जगातील सर्वाधिक दान देणाऱ्यांमध्ये तिसरे अब्जाधिश ठरले आहेत. पहिल्या क्रमांकावर ट्विटरचे मालक जॅक डॉर्सी असून दुसऱ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारताचे या यादीतील एकमेव अब्जाधिश अझीम प्रेमजी आले आहेत. या तीन व्यक्तींनी जगात सर्वाधिक दान केले आहे. फोर्ब्स मॅक्झिननुसार मार्चनंतर जगातील अब्जाधिशांच्या दान रकमेवर ही यादी बनविण्यात आली आहे. अझीम प्रेमजी यांनी आता पर्य़ंत 132 मिलियन डॉलर म्हणजेच एक हजार कोटी रुपयांचे दान केले आहे. जगभरात 2,095 अब्जाधिश असून त्यांच्यापैकी अनेकांनी अद्याप दान केलेले नाही किंवा त्याची माहिती दिलेली नाही. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या....

अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला

दक्षिण कोरियात खळबळ! लष्करी कारवाई करा; किम जोंग उनच्या बहिणीचे सैन्याला 'आदेश'

CoronaVirus: देश हादरला! गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले; अमित शहा कार्यरत

महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन आयसीयूमध्ये; कोरोना टेस्ट निगेटिव्ह

मी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरलो तर...; डोनाल्ड ट्रम्प यांना सतावतेय भीती

आजचे राशीभविष्य - 14 जून 2020; मकर राशीच्या व्यक्तींना प्रिय व्यक्ती भेटेल

टॅग्स :Azim Premjiअझिम प्रेमजीWiproविप्रोUddhav Thackerayउद्धव ठाकरेhinjawadiहिंजवडीcorona virusकोरोना वायरस बातम्या