पुण्यातील हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला पकडण्यात आले आहे. पुण्यातील खराडीतील एका फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी करण्यात येत होती. प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
रॅडीसन हॅटेलच्या मागे एका इमारतीत हा प्रकार सुरु होता. दोन तरूणी आणि पाच पुरुष या रेव्ह पार्टीत होते. छाप्यात पोलिसांना अमली पदार्थ सापडले आहेत. प्रांजल खेवलकर हा शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती आहे. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फ्लॅटमधून हुक्का, ड्रग्स, गांजा, दारू आदी जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला याची माहिती मिळाली होती. प्रांजल खेवलकरसह इतर आरोपींना पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेले आहे. खेवलकर याच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सातही जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या रेव्ह पार्टीत आणखी तीन महिला देखील होत्या, त्या छाप्यावेळी पळून जाण्यात यशस्वी ठरल्या होत्या. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे.