पर्यटकांसाठी मोठी बातमी! लोणावळ्यात जमावबंदी लागू; धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 03:26 PM2021-07-16T15:26:10+5:302021-07-16T15:26:18+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दी करत असल्याने आजपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत

Big news for tourists! Curfew imposed in Lonavla; Vehicles banned within a kilometer of the waterfall | पर्यटकांसाठी मोठी बातमी! लोणावळ्यात जमावबंदी लागू; धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी

पर्यटकांसाठी मोठी बातमी! लोणावळ्यात जमावबंदी लागू; धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी

Next
ठळक मुद्देप्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये असे पोलिसांचे आवाहन

पुणे: लोणावळ्यात पर्यटनस्थळी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आलं असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. त्याच बरोबर धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आलं असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच, धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचं निदर्शनास आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दी करत असल्याने आजपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदीर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा धबधबे, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहतील. 

लोणावळ्यातील पर्यटनस्थळी हे नियम लागू असून खालील बाबींना प्रतिबंध असेल

- पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.
- पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.
- धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
-  पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.
-  पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.
- वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.
- वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे. 
- सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.
- सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
- धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी.

Web Title: Big news for tourists! Curfew imposed in Lonavla; Vehicles banned within a kilometer of the waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.