शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! दीड वर्षे गुंगारा देणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला अटक; स्वत:हून पुणे पोलिसांना आला शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 20:49 IST

विविध गुन्ह्यात रवींद्र बर्‍हाटेचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. 

पुणे : जमीन लाटणे, फसवणूक व धमकावणे अशा विविध गुन्ह्यासह मोक्का कारवाई केल्यानंतरही गेली दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे हा आज दुपारी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत स्वत: हून शरण आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रवींद्र बर्‍हाटे याच्या शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. 

नुकतीच त्यांची पत्नी संगीता, मुलगा मयुर बर्‍हाटे यांच्याबरोबर पिंताबर धिवार, अ‍ॅड. सुनिल मोरे यांना अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात चारी बाजूने फास आवळत आणला होता. त्यामुळे सर्व मार्ग बंद होत असल्याचे दिसल्यावर आज रवींद्र बर्‍हाटे याने पोलिसांशी संपर्क साधून आपण पोलीस आयुक्तालयात येत असल्याचे कळविले. त्यानुसार आज दुपारी तो पोलीस आयुक्तालयात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

बर्‍हाटे याचा शोध घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलीस दलाचे अखंड प्रयत्न सुरु होते.  रवींद्र बर्‍हाटे याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. त्यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले असून त्यांची मालमत्ता सुमारे २ हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते.

बर्‍हाटे गुजरात, कर्नाटकासह विविध जिल्ह्यात होता लपूनरवींद्र बर्‍हाटे हा गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. या काळात तो विविध राज्यात लपून छपून रहात असल्याचे पुढे आले आहे.  पुण्यातून तो पळून जाताना मावळ तालुक्यातील एकाची दुचाकी घेऊन पसार झाला होता. त्यानंतर पुणे परिसरात काही काळ लपून बसला होता. त्यानंतर तो सोलापूर, सातारा या भागात काही ओळखीच्या लोकांकडे राहिला. त्यानंतर तो गुजरात, हैद्राबाद, कर्नाटक या राज्यात गपचूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. आज पोलीस आयुक्तालयात आल्यानंतर तो तणावाखाली दिसून आला. त्याला चालतानाही त्रास होत असल्याचे जाणवत होते. पोलीस उद्या त्याला न्यायालयात हजर करणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक