शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! 'मॉन्सून एक्सप्रेस' सुसाट; कोकणासह सोलापूरपर्यंत मारली मजल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 15:41 IST

३ जून रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर त्याने शुक्रवारपर्यंत कर्नाटकातील कारवारपर्यंत मॉन्सूनने वेगवान वाटचाल केली होती.

पुणे : केरळमध्ये ३ जूनला आगमन झाल्यानंतर मॉन्सूनने गेल्या दोन दिवसात वेगवान प्रवास करीत महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.  नैंऋत्य मोसमी वार्‍यांच्या अरबी समुद्रातील शाखेने जोरदार मुसंडी मारली आहे. दक्षिण कोकणातील हर्णेपासून सोलापूरपर्यंत मॉन्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात इतक्या लवकर मॉन्सून दाखल होण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. गेल्या वर्षी दक्षिण कोकण, कोल्हापूरात ११ जून रोजी मॉन्सून दाखल झाला होता. 

मॉन्सून शनिवारी हर्णे, सोलापूर, रायचूर, तिरुपती, कुडलोरपर्यंत दाखल झाला आहे.

येत्या २४ तासात मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरीत भाग, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि तामिळनाडुचा उर्वरित भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे़ 

केरळमध्ये ३ जून रोजी  आगमन झाल्यानंतर त्याने शुक्रवारपर्यंत कर्नाटकातील कारवारपर्यंत मॉन्सूनने वेगवान वाटचाल केली होती. आज त्यात आणखी प्रगती केली असून गोव्यासह कोकणातील हर्णे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व लगतच्या मराठवाड्यातील काही भागापर्यंत मजल मारली आहे. 

हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या वेळांनुसार दक्षिण कोकण ७ जून, कोल्हापूर ९ जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमन होत असते. यंदा मात्र, मॉन्सून एक्सप्रेस सुसाट सुटली आहे. तिने निर्धारित वेळेपूर्वीच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. पुढील ७ दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणारयाबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यप यांनी सांगितले की, मॉन्सूनने आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये प्रवेश केला आहे. सर्वसाधारणपणे मॉन्सून १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. यंदा तो काही दिवस अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात पोहचणार आहे. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते दक्षिण केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे कोकणासह या ६ जिल्ह्यात गेले दोन दिवस सर्वदूर पाऊस झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. येत्या २४ तासात कोकण व मध्य महाराष्ट्रातील आणखी काही भागात मॉन्सून पुढे वाटचाल करेल, अशी शक्यता आहे.  

मुंबई, पुण्यात मॉन्सून कधी?आज रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत पाऊस झाला आहे. कुलाबा आणि सांतांक्रुझ येथे आज पावसाचा शिडकावा झाला. जर येत्या २४ तासात मुंबई, पुणे येथे चांगला पाऊस झाला तर मॉन्सून या भागात आला असे म्हणता येईल. या दोन दिवसात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. जर येत्या ४८ तासात अपेक्षित इतका पाऊस झाला नाही तर मुंबई, पुण्यात मॉन्सूनच्या आगमनाला ६ ते ७ दिवस लागू शकतात. मुंबई, पुण्यात मॉन्सूनच्या आगमनासाठी उद्यापर्यंत वाट पहावी लागेल, असे कश्यपी यांनी सांगितले. 

शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात देवगड २७, सोलापूर २५, परभणी ६, चंद्रपूर ८, ब्रम्हपूरी २२, नाशिक १५, मालेगाव ४, जळगाव ३, पुणे ६, लोहगाव १२, पाषाण ७ मिमी पावसाची नोंद झाली होती.शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे ३, लोहगाव ३४, कोल्हापूर २, नाशिक २, सांगली १, सोलापूर १, पणजी ३, डहाणु ६, अमरावती १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुताश ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून वारे ताशी ३० ते ४० वेगाने वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

नंदुरबार, जळगाव, नांदेड, सिंधुदुर्ग, मुंबई हे जिल्हे वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानMonsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसSolapurसोलापूर