शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मोठी बातमी : पुणे शहरात सर्व राजकीय - सांस्कृतिक - सामाजिक कार्यक्रमांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 21:27 IST

लग्नात 50 तर अंत्यविधीसाठी 20 जणांनाच उपस्थित राहण्याची मुभा

पुणे : शहरातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत चालल्यामुळे शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पालिका आयुक्तांनी याबाबतचा आदेश काढला असून सर्व प्रकारच्या राजकीय-सांस्कृतिक-सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांना अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच लग्न समारंभासाठी 50 तर अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांना च उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आलेली आहे.

शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ सुरु झाली आहे. संसर्गाचा फैलाव पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. बहुतांश ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. गेल्या महिन्याभरात सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजारांवर पोचली आहे. पालिका आयुक्तांनी मंगळवारी रात्री काढलेल्या आदेशामध्ये गर्दी होणारे कार्यक्रम होणार नाहीत याची दक्षता घेतली आहे.

रुग्ण कमी झाल्याने राजकीय, सांस्कृतिक तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये  200 लोकांच्या उपस्थितीतीला मान्यता देण्यात आली आहे. परंतु, त्यापेक्षाही अधिक लोक गर्दी करु लागले आहेत. त्यामुळे सरसकट सर्वच कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच या निर्बंधांमधून अत्यावश्यक सेवांना मात्र वगळण्यात आले आहे.====आयुक्तांच्या आदेशामध्ये सर्व कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील असे नमूद करण्यात आले आहे. परंतु, शासकीय की खासगी याचा उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर स्पष्टता असणे आवश्यक आहे.====महत्वाचे निर्णय1. प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील मॉल, थिएटर, रेस्टॉरंट, बार, फूट कोर्ट यांना रात्री 10 पर्यंतच मुभा2.  घरपोच जेवणाची सुविधा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार3. प्रतिबंधात्मक सूचनांची माहिती दर्शनीय भागात लावणे बंधनकारक4  धार्मिक स्थळांमधील प्रवेशावर मर्यादा, ऑनलाइन पासची सुविधा5. लग्नसमारंभासाठी केवळ 50 जणांना उपस्थित राहता येईल.6. अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांना परवानगी====* शहरातील सर्व आस्थापनांमध्ये विनामास्क प्रवेश नाही.* प्रवेशद्वारावर थर्मामिटर, थर्मल गन, पल्स आॅक्सिमीटर ठेवण्यात यावा.* हॅन्ड सॅनिटायझर ठेवणे.* सुरक्षित अंतर राखले जाईल याकडे लक्ष देणे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसcultureसांस्कृतिकPoliticsराजकारण