मोठ्या आवाजाचे डीजे सहन केले जाणार नाही : पालकमंत्र्यांचा गणेश मंडळांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 07:57 PM2018-08-30T19:57:47+5:302018-08-30T20:05:00+5:30

ध्वनी प्रदूषणाचा लहान मुले, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असल्यामुळे गणेशोत्सवादरम्यान मद्यपान आणि मोठ्या आवाजात डीजे वाजवणे सहन केले जाणार नाही.

Big DJ sound will not be tolerated : Girish bapat warns Ganesh Mandals | मोठ्या आवाजाचे डीजे सहन केले जाणार नाही : पालकमंत्र्यांचा गणेश मंडळांना इशारा

मोठ्या आवाजाचे डीजे सहन केले जाणार नाही : पालकमंत्र्यांचा गणेश मंडळांना इशारा

Next
ठळक मुद्देतीन दिवसांपासून आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कार्यान्वितशहरात ठिकठिकाणी जास्तीत जास्त व सुरक्षित विसर्जन घाट निर्माण करण्याचे काम

पुणे : गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा लहान मुले, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असल्यामुळे गणेशोत्सवादरम्यान मद्यपान आणि मोठ्या आवाजात डीजे वाजवणे सरकार सहन करणार नाही, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गणेश मंडळांना दिला. 
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, महापालिका आयुक्त सौरभ राव, अपर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, तसेच इतर पोलीस अधिकारी व गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत गणेश मंडळाच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या. गणेश मंडळांनी आपल्या मंडपात सीसीटिव्ही बसविण्यावर भर द्यावा. तसेच स्वच्छतेवरही लक्ष द्यावे. त्याबरोबरच थर्माकॉलवर सरकाने बंदी घातली आहे. मंडपात त्याचा वापरही गणेश मंडळांनी टाळावा, असे आवाहन बापट यांनी केले. 
यावेळी पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी गणेश मंडळांना गणेशोत्सवादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास दिला. तर सौरभ राव म्हणाले, महापालिकेकडून गणेश मंडळांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. गणेश मंडळांनी परवानगीसाठी आॅनलाईन तसेच आॅफलाईन अर्ज करावेत. मागील तीन दिवसांपासून आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी जास्तीत जास्त व सुरक्षित विसर्जन घाट निर्माण करण्याचे काम पालिकेकडून सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.  

Web Title: Big DJ sound will not be tolerated : Girish bapat warns Ganesh Mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.