महिला सुरक्षेसाठी ‘बडी कॉप’

By admin | Published: March 25, 2017 03:45 AM2017-03-25T03:45:49+5:302017-03-25T03:45:49+5:30

पुणे शहरासह आयटी पार्कमधील महिलांच्या सुरक्षिततेची गरज ओळखून व्हॉट्स अ‍ॅपच्या धर्तीवर बडीकॉप ही संकल्पना

'Big cop' for women's safety | महिला सुरक्षेसाठी ‘बडी कॉप’

महिला सुरक्षेसाठी ‘बडी कॉप’

Next

वाकड : पुणे शहरासह आयटी पार्कमधील महिलांच्या सुरक्षिततेची गरज ओळखून व्हॉट्स अ‍ॅपच्या धर्तीवर बडीकॉप ही संकल्पना पुणे शहर पोलिसांच्या पुढाकाराने राबविण्यात येणार आहे. या गु्रपमध्ये ४० महिला आणि एक पोलीस कर्मचारी सक्रिय असणार असून, यामुळे महिलांना तातडीने मदत मिळू शकणार आहे. खराडी, हिंजवडी, हडपसर, मगरपट्टा आदी आयटी पार्कमध्ये एकाच वेळी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, सोमवारी ग्रुपचा शुभारंभ होणार आहे.
हिंजवडी येथील एचआयएच्या (हिंजवडी इंड्रस्टियल असोसिएशन) कार्यालयात आयटीयन्सला माहिती देण्यासाठी एचआयएच्या नोंदणीकृत कंपन्यांतील एचआर व्यवस्थापकांना निमंत्रित करण्यात आले होते. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ही संकल्पना समजावून सांगितली. अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त (सायबर सेल) दीपक साकोरे, गणेश शिंदे, निरीक्षक अरुण वायकर, एचआयएचे सुनील अडवानी, सुरक्षा विभागाचे प्रमुख मयंक गुप्ता, सायबर तज्ज्ञ पंकज घोडे उपस्थित होते.
तुमच्या जवळच्या मित्राप्रमाणे हे बडीकॉप मदत करणार आहे. बडीकॉप सभासद महिलेच्या फेसबुक, एसएमएस, कॉल, व्हाट्सअ‍ॅप, ई-मेल, ट्विटर आदी सर्व खात्यात संलग्न असेल. विनाइंटरनेट बॅडीकॉपशी जिथे जाल तिथे २४ तास संपर्कात असेल. बडीकॉप महिलांना संकटात आहोत, असे वाटल्यास आहे त्या ठिकाणी मदत मिळवून देणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. प्रतिसाद पाहून योजना राज्यात राबवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: 'Big cop' for women's safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.