शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई; अत्यावश्यक सेवेच्या टेम्पोतून गुटख्याची वाहतूक; १० लाखांचा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 21:44 IST

अत्यावश्यक सेवेचा बोर्ड गाडीवर लावून गुटख्याची वाहतूक होत असल्याची मिळाली होती माहिती...

ठळक मुद्देदोघांना अटक : अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

पुणे : टेम्पोवर अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावून त्यातून बेकायदेशीरपणे गुटखा व तंबाखुची वाहतूक करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने फुरसुंगीजवळ एक टेम्पो पकडून त्यातून १० लाखांचा माल जप्त केला आहे.मंदार राजेंद्र ठोसर (रा. अवधूत बिल्डिंग, हडपसर) आणि मनोज सुमतीलाल दुगड (रा.भक्तीविहार, भेकराईनगर, फुरसुंगी) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद टिळेकर व अमोल पिलाणे यांना भेकराईनगरमधील दोघे जण टेम्पोतून गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला असता अत्यावश्यक सेवा असा बोर्ड असलेला एक टेम्पो पोलिसांना दिसला. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली.तेव्हा त्यात गुटखा व तंबाखु असा ९ लाख १४ हजार रुपयांचा माल आढळून आला.पोलिसांनी टेम्पोसह १२ह जार १४ हजार ५२९ रुपयांचा माल जप्त केला आहे. 

ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चनसिंह, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, कर्मचारी उदय काळभोर, रमेश गरुड, प्रमोद टिळेकर, अमोल पिलाणे, मोहन येलपले यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक