शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लर, हाॅटेल्स, बारवर मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 16:49 IST

१ मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन व रमझान ईदच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने गेल्या दोन आठवड्या पासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे

पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच बाहेरील वस्तीतील (out skirts)  हाॅटेल्स, बार मध्ये पहाटेपर्यंत तरुणाईच्या सुरू असलेल्या हुक्का पार्ट्यां व त्यामुळे उद्भवणारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागामार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. १ मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन व रमझान ईदच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने गेल्या दोन आठवड्या पासून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. 

करोना नंतर सुरु झालेल्या न्यू नाॅर्मल लाईफस्टाईल मध्ये पुण्यातील तरुणाईमध्ये रात्री उशिरापर्यंत हाॅटेलींग करणे.  हुक्का पार्टीचे प्रमाण अधिकतेने वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर योग्य नियंत्रण आणण्यासाठी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सामाजिक सुरक्षा विभागास दिली आहे. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत व विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरच असलेल्या हाॅटेल्स, बार यांना प्रथम वेळेत बंद करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या. तथापी त्यानंतरही आस्थापना विहीत वेळेत बंद होत नसल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे.

शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हाॅटेल्स, बारवर तसेच हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागास नुकतेच पुणे पोलीस दलात हजर झालेले दहा परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक व अंमली पदार्थ विरोधी सेलचे अधिकारी व स्टाफही देण्यात आले होते. 

सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत धनकवडी येथील सरस्वती कॉम्प्लेक्स मधील 'कॅफे सायक्लोन' मध्ये पहाटे ०२.२० वा. च्या  सुमारास अवैध रित्या हुक्का बार चालू होते. त्याठिकाणी पंचासमक्ष छापा कारवाई करण्यात आली. घटनास्थळावर ११ हुक्कापॉट्स, चिलीम व वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ व इतर साहित्य असे एकुण रु. ४७,५००/- चा मुद्देमाल मिळून आला आहे. तो कायदेशीररीत्या  जप्त करून 'कॅफे सायक्लाॅन' बार व हुक्का पार्लरचे मालक केतन किसन तापकीर( वय २६ वर्षे,) कुणाल किसन तापकीर( वय २९ वर्षे) ३) बार व्यवस्थापक नामे अभिषेक दत्तात्रय जगताप (वय २२ वर्षे) तसेच हुक्का सर्व्हिस करणारे ४ इसम यांच्या विरुद्ध सहकार नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकhotelहॉटेल