शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; कोयता गॅंगला कोयते पुरवणारा गजाआड, तब्बल 105 कोयते जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 12:24 IST

पुणे शहरात कोयता गॅंगने चांगलाच धुमाकूळ घातला आहे

पुणे/किरण शिंदे : पुणे शहरात कोयता गॅंगने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भरदिवसा चोरी, दुकाने - हॉटेल फोडणे, अशा घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची गस्त असूनही कोयता गॅंगच्या गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. त्यातच पुणे शहराच्या पोलीस दलाच्या युनिट एकने मोठी छापेमारी केली आहे. कोयता गॅंगला कोयता पुरवणाऱ्या बोहरी आळीतील कोयता विक्रेत्यावर कारवाई केली आहे.  या छापेमारीत त तब्बल 105 कोयते पोलिसांनी पकडले आहेत. हुसेन खोजमा राजगरा असे कोयता पुरवणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बोहरी आळीत पोलिसांची छापेमारी आहे. या कारवाईत हुसेन खोजमा राजगरा याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 105 कोयते पकडण्यात आले आहेत. तब्बल 53 हजार 600 रुपयाचे कोयते गुन्हे शाखेच्या युनिट एकने केले जप्त केले आहेत. शहर पोलीस दलातील आतापर्यंतची सर्वात मोठी कोयत्या वरील कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सहयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोणपेचे, पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या पथकाने हि मोठी कामगिरी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक