शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

Bhushi Dam: भुशी डॅम ओव्हरफ्लो! पायऱ्यांवरच्या पाण्याचा वेगही प्रचंड, पर्यटकांनी जाऊ नये - पोलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 12:36 IST

जोरदार पावसामुळे डोंगर भागातून वाहणारे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्याने डोंगर भागात जाणेही धोकादायक असू शकते

लोणावळा : लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून प्रचंड वेगाने पाणी वहात असल्याने पर्यटकांनी सुरक्षेच्या कारणास्तव धरण परिसरात जाऊ नये असे आवाहन लोणावळापोलिसांनी केले आहे.

लोणावळा परिसरात काल शनिवार पासून धुव्वाधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागले असून भुशी धरण ओव्हरफ्लो होऊन धरणाच्या पायऱ्यांवरून प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे. पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यामध्ये जाऊन उभे रहाणे शक्य नसल्याने पर्यटक पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ शकतात. आज सकाळी पोलीस प्रशासनाने भुशी धरण परिसरातील पाण्याच्या प्रवाहाची पाहणी करत पर्यटकांना धरण भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच जोरदार पावसामुळे डोंगर भागातून वाहणारे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले असल्याने त्यांच्या खाली थांबणे अथवा डोंगर भागात जाण्याचा प्रयत्न करणे हे धोकादायक ठरणारे असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी. तसेच धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन लोणावळा पोलीस व नगर परिषद प्रशासन यांच्याकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेlonavalaलोणावळाRainपाऊसDamधरणPoliceपोलिसtourismपर्यटन