बीएचआर प्रकरणात दोघांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST2021-06-26T04:09:31+5:302021-06-26T04:09:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बीएचआर घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ संशयित आरोपींपैकी ९ जणांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. ...

In the BHR case, the interim bail application of both was rejected | बीएचआर प्रकरणात दोघांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

बीएचआर प्रकरणात दोघांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बीएचआर घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ संशयित आरोपींपैकी ९ जणांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यातील जयश्री तोतला व जयश्री मणियार या दोघांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायमूर्ती एस. एस. गोसावी यांनी शुक्रवारी फेटाळला़. उर्वरित आरोपींच्या जामिनावर १ जुलैला कामकाज होणार आहे़

पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह दहा जणांवर फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे़ याप्रकरणी २६ नोव्हेंबर रोजी १३५ जणांचे पथक जळगावात दाखल झाले होते़ त्याच प्रकरणात पुन्हा पुणे पोलिसांची ५० जणांची दहा पथके १७ जून रोजी जळगावात आली होती़ तर पाच पथके औरंगाबाद तसेच मुंबई, अकोला व पुणे येथे पाठविण्यात आली होती़ या पथकांनी अकरा संशयितांना अटक केली होती़

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या ११ संशयितांपैकी ९ संशयितांनी जामिनासाठी अर्ज दाखल केले होते़ दरम्यान, शुक्रवारी जामीन अर्जावर कामकाज होणार नव्हते़ परंतु, आमच्या जामीन अर्जावर आजच सुनावणी घ्यावी, अशी मागणी जयश्री तोतला व जयश्री मणियार यांचे वकील अ‍ॅड़ आर. एफ. तोतला यांनी केली़ त्यानुसार या दोघांच्या अंतरिम जामीन अर्जांवर सुनावणी झाली.

दुसरीकडे मुख्य सूत्रधार सुनील झंवरचा अनेकदा अटकपूर्व जामीन फेटाळलेला असतानाही त्यांनी पुन्हा एकदा पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे़

Web Title: In the BHR case, the interim bail application of both was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.