भुशी धरण ओव्हरफ्लो

By Admin | Updated: June 23, 2015 03:25 IST2015-06-23T03:25:51+5:302015-06-23T03:25:51+5:30

मागील चार दिवसांपासून लोणावळा शहर व परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच रविवारी २४ तासांत लोणावळ्यात सुमारे १६० मिमी पाऊस

Bhoshi dam overflow | भुशी धरण ओव्हरफ्लो

भुशी धरण ओव्हरफ्लो

लोणावळा : मागील चार दिवसांपासून लोणावळा शहर व परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच रविवारी २४ तासांत लोणावळ्यात सुमारे १६० मिमी पाऊस झाल्याने लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असलेले भुशी धरण सोमवारी सकाळी साडेआठ वाजता शंभर टक्के भरून वाहू लागले आहे.
सकाळी १० वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून व सत्यम, शिवम, सुंदरमरुपी पायऱ्यांवरून पाणी वाहू लागल्याने धरण भागात फिरायला आलेल्या पर्यटकांनी मनसोक्त वर्षाविहाराचा आनंद लुटला. मागील वर्षी २६ जुलै रोजी धरण भरले होते. तुलनेने या वर्षी तब्बल एक महिना अगोदरच धरण भरल्याने पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे़ सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान ७८ मिमी पाऊस झाला. या वर्षी पावसाने ७ जूनपासूनच शहरात चांगली हजेरी लावल्याने व रविवारी सकाळपासून जोरदार वृष्टी झाल्याने दोन दिवसांपूर्वी केवळ ३० टक्के असलेले भुशी धरण सकाळी शंभर टक्के भरले़ जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे़ (वार्ताहर)

Web Title: Bhoshi dam overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.