शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
4
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
5
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
6
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
7
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
8
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
9
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
10
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
11
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
12
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
13
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
14
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
15
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
16
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
17
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
18
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
19
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
20
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट

Bhosari Vidhan Sabha 2024: भोसरी मतदारसंघात महेश लांडगे-अजित गव्हाणे यांच्यात काट्याची लढत

By प्रकाश गायकर | Updated: November 21, 2024 13:09 IST

मतदारांना आणताना कार्यकर्त्यांची दमछाक

पिंपरी : भाजपचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यात भोसरीमध्ये काट्याची टक्कर असून, बुधवारी ४९२ केंद्रांवर मतदान पार पडले. मतदारांची सकाळपासूनच गर्दी होती. दुपारच्या टप्प्यात त्यात आणखी वाढ झाली. सव्वासहा लाख मतदार असल्याने त्यांना आणताना कार्यकर्त्यांची दमछाक होत होती.भोसरीत एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांचा उत्साह सकाळीच जास्त होता. सकाळी साडेसातला राजमाता जिजाऊ महाविद्यालयात तुरळक मतदार होते, तर महात्मा फुले विद्यालय व आदर्श शिक्षण संस्थेतील केंद्रांवर गर्दी होती. ज्येष्ठ नागरिक व महिलांची संख्या अधिक होती. दिघी, मोशी, बोऱ्हाडेवाडी व जाधववाडी येथील केंद्रांवर सकाळी अकरानंतर मतदारसंख्या जास्त होती. भोसरी गावठाण भागातील केंद्रावर दुपारी १२ ते २ या वेळेत गर्दी कमी होती. मात्र, तीननंतर संख्या वाढली. मोशीतील गायकवाडवस्ती, तुपेवस्ती, संभाजी कॉलनी, भीमनगर आणि आदर्शनगर केंद्रावर सकाळपासून दुपारी दोनपर्यंत गर्दी कायम होती. सायंकाळी कमी झाली. भोसरीतील चक्रपाणी वसाहत, दिघी रोड, रामनगर, धावडेवस्ती आणि सद्गुरूनगरमध्ये सायंकाळी पाचला गर्दी झाली होती. चऱ्होली, चोविसावाडीत सकाळीच रांगाचऱ्होली, चोविसावाडी या समाविष्ट गावांमध्ये शेती केली जाते. स्थानिक शेतकऱ्यांसह नव्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये उच्चभ्रूंचे वास्तव्य आहे. येथे सकाळीच रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर तुरळक गर्दी होती. बोटावर शाई लई भारीचऱ्होली येथील पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेत हरित केंद्र करण्यात आले होते. मतदान केंद्राच्या बाहेर फोटो काढण्यासाठी ‘सेल्फी पॉइंट’ उभारण्यात आला होता. त्यावर ‘बोटावर शाई दिसते लई भारी, वृक्षरक्षणाची माझी जबाबदारी’ असा संदेश देत जनजागृती करण्यात आली. त्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bhosari-acभोसरीmahesh landgeमहेश लांडगेAjit Pawarअजित पवारBJPभाजपा