भोसरी भूखंड एमआयडीसीचा की खडसेंचा? प्रकरण न्यायप्रविष्ट; अजूनही क्लीन चिट नाही, तपास सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 08:35 AM2020-10-24T08:35:56+5:302020-10-24T08:36:36+5:30

२०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर  खडसे महसूलमंत्री झाले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसीत क्वालिटी सर्कलजवळ सर्व्हे क्रमांक ५२,२, ए -२ येथील भूखंड खरेदी प्रकरण बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत गवंडे यांनी २०१५ मध्ये उघडकीस आणले होते.

Bhosari plot of MIDC or Khadse? Case justified; Still no clean chit investigation continues | भोसरी भूखंड एमआयडीसीचा की खडसेंचा? प्रकरण न्यायप्रविष्ट; अजूनही क्लीन चिट नाही, तपास सुरूच

भोसरी भूखंड एमआयडीसीचा की खडसेंचा? प्रकरण न्यायप्रविष्ट; अजूनही क्लीन चिट नाही, तपास सुरूच

Next

पिंपरी (पुणे) : भाजपचे तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सत्तेचा गैरवापर करून पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसीत जमीन खरेदी केल्याचे प्रकरण गाजले होते. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. तसेच पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हा विषय न्यायप्रविष्ट आहे.  या प्रकरणी खडसे यांना अजूनही क्लीन चिट मिळालेली नाही. ही जमीन खडसेंची की एमआयडीसीची या प्रश्नाची उकल झालेली नाही.

२०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर  खडसे महसूलमंत्री झाले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसीत क्वालिटी सर्कलजवळ सर्व्हे क्रमांक ५२,२, ए -२ येथील भूखंड खरेदी प्रकरण बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत गवंडे यांनी २०१५ मध्ये उघडकीस आणले होते. कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.   खडसे यांनी खरेदीदार, महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप होता. चाळीस वर्षांपासून एमआयडीसीकडून ताब्यात घेतलेली जमीन खडसेंनी पत्नी मंदाकिनी आणि जावई  गिरीश चौधरी यांच्या नावे खरेदी केली होती. ही जमीन बाजारभावानुसार ६० कोटींपेक्षा अधिक किमतीची होती. त्यामुळे हे भूखंड घोटाळ्याचे प्रकरण गाजले होते. त्यानंतर खडसे यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. याचिकाकर्ते हेमंत गवंडे म्हणाले, ‘प्रकरणाबाबत पुणे न्यायालयात खटला सुरू असून निकाल लागलेला नाही. खडसे यांना क्लीन चिट मिळालेली नाही. 

तपासाचे काय होणार?
भाजपच्या सत्ता कालखंडात खडसे यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे प्रकरणाच्या तपासाचे काय होणार? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
 

Web Title: Bhosari plot of MIDC or Khadse? Case justified; Still no clean chit investigation continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.