भोर ठरतेय चित्रीकरणाची पंढरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 07:11 PM2018-09-11T19:11:15+5:302018-09-11T19:25:51+5:30

शहरात व तालुक्यात बाराही महिने विविध मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण सुरु असते. यातून स्थानिकांना विविध प्रकारचे काम मिळते. यामुळे भोर चित्रीकरणासाठी नंदनवन ठरते आहे. 

bhor place famous for cinema shooting | भोर ठरतेय चित्रीकरणाची पंढरी

भोर ठरतेय चित्रीकरणाची पंढरी

googlenewsNext
ठळक मुद्देधरणे, बनेश्वरची बाग, गडकोट किल्ले, इतिहासकालीन वाडे यामुळे चित्रपटसुष्टीतील लोक भोरकडे आकर्षितसेट उभारण्याचा खर्च होत नसल्यामुळे निर्माते व दिग्दर्शकांचा कल भोरकडे  दादा कोंडके यांचा स्टुडिओ मात्र दुर्लक्षित

भोर : शहरातील निरानदी काठावर वसलेला संस्थानकालीन पंतसचिवांचा भव्य दिव्य राजवाडा, संस्थानकालीन घाट, विविध मंदीरे, दगडी इमारती, निर्सगरम्य गावे, आंबवडेचा झुलता पुल, धरणे, बनेश्वरची बाग, गडकोट किल्ले, इतिहासकालीन वाडे यामुळे चित्रपटसुष्टीतील लोक भोरकडे आकर्षित होत आहेत. शहरात व तालुक्यात बाराही महिने विविध मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण सुरु असते. यातून स्थानिकांना विविध प्रकारचे काम मिळते. यामुळे भोर चित्रीकरणासाठी नंदनवन ठरते आहे. 
  पुणे शहरापासून ५० किलोमीटरवर भोर हे संस्थानकालीन सुमारे २० हजार लोकवस्तीचं गाव असून निरानदी काठावर पंतसचिवांनी १७७० साली राजवाडा बांधला. सुमारे ४० हजार स्वेअर फुटाचे संपुर्ण लाकडी बांधकाम असून दरबार सभागृह, महल अशी ३५ दालने आहेत. नगारखाना उत्तम कठडे, झुंबरे आहेत. मुख्य दरबार सागवान लागडाचा सभामंडप भव्य प्रवेशव्दार हे चित्रपट व मालिकांसाठी तयार सेटसारखे आहेत. या शिवाय शिवापुर आळी गणेशपेठेतील घरे, जुने वाडे, भोरेश्वर मंदीर, पिसावरे येथील वाडा इंगवली गाव, खंडोबाचा माळ, निरादेवघर, ब्रिटीशकालीन दगडी भाटघर धरणाच्या भागातील निर्सगरम्य परिसर, राजा रघुनाथराव विद्यालयाची संस्थानकालीन दगडी इमारत, रामबाग येथील स्काऊटगाईडची इमारत, आंबवडे गावातील झुलता पुल, पांडव कालीन नागेश्वर मंदीर, बनेश्वर मंदीर व बाग, कारी येथील सरदार कान्होजी जेधेंचा वाडा, रोहिडा, रायरेश्वर किल्यांचा परिसर हि मालिका व चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीची प्रमुख ठिकाणे आहे१९५० च्या दशकात प्रथम दिलीपकुमार यांनी बैरागी चित्रपटाचे भोरला चित्रीकरण झाले. त्यानंतर दादा कोंडके यांनी इंगवली या आपल्या गावात स्टुडिओ उभारुन अनेक चित्रपटांचे चित्रीकरण केले. त्यानंतर राजकुमार संतोषी, बोनी कपुर, स्मिता तळवळकर, नितिन देसाई यांच्या अनेक चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण झाले. अमिताभ बच्चन, दिलीपकुमार, अक्षयकुमार, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपुर, गोविंदा, रणवीर कपुर, अनुपम खेर, मोहन आगाशे, निळु फुले, अशोक सराफ, डॉ. अमोल कोल्हे, संजय नार्वेकर, ऐश्वर्या राय, सुश्मिता सेन, डिंपल कापडिया, दिलीप प्रभावळकर, शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, अमीर खान, सिध्दार्थ जाधव, मेधा मांजरेकर यांनी चित्रीकरण केले आहे. तर दिपीका पदुकोण व रणवीर कपुर यांनी बाजीराव मस्तानी चित्रपटाचे चित्रीकरण याच राजवाडयात केले.
   पुणे शहरापासुन जवळ असल्याने अनेक कलाकार पुण्यात राहून येऊन जाऊन चित्रीकरण करतात. निर्सगरम्य वातावरण आणि खर्च कमी प्रमाणात शिवाय राजवाडे, गडकोट किल्ले, पुरातन मंदिरे डोंगरदरे, घाट यामुळे सेट उभारण्याचा खर्च होत नसल्यामुळे निर्माते व दिग्दर्शकांचा कल भोरकडे असून अनेक चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण येथे होत आहे. यामुळे स्थानिक कालाकारांना काम व रोजगार मिळतो.
..........................
 दादा कोंडके यांचा स्टुडिओ मात्र दुर्लक्षित 
  मराठी चित्रपटांना खऱ्या अर्थाने भोरकडे आणणारे आणि चित्रपटाच्या माध्यमातून भोरचे नाव गिनिज बुकावर झळकवणारे दादा कोंडके यांच्या निधनानंतर त्यांच्या इंगवली गावातील दादा कोंडके स्टुडिओची वाईट अवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज असून दादांचे स्मारक गावात करण्याची मागणी होत आहे.
  

Web Title: bhor place famous for cinema shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.