शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

घरफोडीच्या घटना वाढल्याने भोर शहर बनले असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 14:15 IST

एकाच रात्रीत बंद असलेली चार ते पाच घरे फोडण्याचे प्रकार घडत आहेत...

ठळक मुद्देआठवड्यात आठ घरे फोडली : सहा महिन्यांत तालुक्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ

भोर :  शहरातील बंद घरांचे कुलूप तोडून घरात घुसून घरातील लॉकर तोडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने चोऱ्या करणे पर्किंगमधील दुचाकी वाहने चोरणे, पेट्रोल चोरणे तर तालुक्याच्या ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी घरात घुसून नागरिकांना मारहाण करुन घरातील सोने, पैसे चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. एका आठवड्यात मागील सोमवारी रात्री ४ व आज सोमवारी रात्री ४ अशी एकूण ८ बंद घरे फोडली असून, या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे लोकांची झोप उडाली आहे. एका वर्षात विविध प्रकारच्या १४ चोऱ्या झाल्या असून, भोर पोलिसांना ६ चोऱ्यांचा तपास लागलेला नाही. मात्र एकाच रात्रीत चार घरे फोडल्यास पोलीस त्याचा एकच गुन्हा दाखल करीत असल्याने चोऱ्या कमी दिसत आहेत. भोर शहरात मंगळवारचा आठवडा बाजार एस.टी. स्टँडवर गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकीट मंगळसूत्र चोरीचे प्रकार घडत आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस माहिती घेतात, सल्ला देऊन नंतर फाईल बंद होते. यामुळे चोरीच्या गुन्ह्यांचा तपास वर्षानुवर्षे लागत नाही. त्यामुळे चोºया थांबत नाहीत. भोर शहरात मागील सहा महिन्यांपासून एकाच रात्रीत बंद घरांची दिवसभर टेहळणी करुन रात्रीच्या वेळी नागरिक झोपेत असताना बंद घरांचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन घरातील लॉकर तोडून रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. एकाच रात्रीत बंद असलेली चार ते पाच घरे फोडण्याचे प्रकार घडत आहेत. मे महिन्यात भोर शहरातील वाघजाईनगर भागातील शिक्षक सोसायटीत चोरांनी प्रवेश करुन घरे फोडली आणि जागे झालेल्या येथील एका नागरिकाने हे पाहिल्यावर सदरचा नागरिक व त्याच्या मुलावर दांडक्याने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले होते. मात्र त्याला चार महिने झाले तरी अद्याप ना त्याचा तपास लागला ना चोर पकडला. भोर तालुक्यात जबरी चोरीचे २, घरफोडी ३, मारहाण करणे ३, सर्व प्रकारच्या चोºया ९, सरकारी नोकर मारहाण ५, दरोडा तयारीत एक, असे १७ गुन्हे झाले. ६ गुन्हे पेंडिंग आहेत. मात्र यातील दरोड्याच्या तयारीत असलेला एक गुन्हा वगळता एकाही चोराला पकडण्यास किंवा गुन्हा उघड करण्यास भोर पोलिसांना यश आलेले नाही. शिवाय एकाच रात्रीत ४ घरे फोडलेल्याचा एक गुन्हा दाखल केला जात असल्याने मागील आठवड्यात ८ घरे फोडली. त्याचे २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नीरा देवघर धरण भागातून महाड-पंढरपूर हा राज्य मार्ग तर पूर्व भागातून पुणे-सातारा हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. पश्चिम भाग डोंगर दऱ्यांचा व वळणावळणांचा आणि झाडाझुडपांचा रस्ता यामुळे रात्रीच्या वेळी फारसी वाहतूक नसते. याचा फायदा घेत अनेक गुन्हेगार खून करुन मृतदेह टाकण्यासाठी या भागाचा वापर सर्रासपणे करतात. यामुळे अनेकदा गुन्हे उघड होत नाहीत. पश्चिम दुर्गम डोंगरी असल्याने विजेचा अभाव यामुळे रात्री अपरात्री अंधाराचा फायदा घेत चोरांचे टोळके रस्त्यावरील, गावातील घरात घुसून घरातील नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून वेळप्रसंगी जबर मारहाण करुन घरातील पैसे, सोनेनाणे, अंगावरील दागिने हिसकावून घेऊन चोऱ्या केल्या जात आहेत. शिवाय वाहने अडवून चोरी करणे या लहान-मोठ्या चोऱ्यांच्या घटना सतत घडत असल्याने लोकांना जीव मुठीत धरुन झोपावे लागत आहे. अनेकांची झोपच उडाली आहे. तर महामार्गावरील सततच्या वाहतुकीमुळे रात्रीच्या वेळी चोऱ्या वाढत असून यात काहींना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र याकडे भोर, नसरापूर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.  तालुक्यातील गावांची संख्या आणि त्यांची लोकसंख्या याचा विचार करता असलेली पोलीससंख्या मर्यादित असून अनेक जागा रिक्त असल्याने पोलिसांवर कामाचा ताण येत आहे. तो कमी व्हावा म्हणून पोलीस ठाण्यांच्या वतीने गावागावातील होणाऱ्या चोऱ्यांमुळे रात्रीच्या वेळी गावात गस्त घालावी, अंतर्गत वादविवाद मिटावे यामुळे ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात आली होती. आणि त्या माध्यमातून कामही सुरु होते. अनेकांना पोलीस ठाण्याच्या वतीने ओळखपत्रही वाटप केली होती. मात्र पोलीस अधिकाºयांची बदली झाली की सदरची योजना बारगळत आहे.

......................................

रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांना चोर का सापडत नाहीत?

शहरातील घरांना कुलूप आहे हे बाहेरुन आलेल्या चोरांना कसे समजते? का स्थानिक चोर चोरीत सामील आहेत?शहरात मोठ्या प्रमाणात बाहेरील नागरिक विविध व्यवसाय करण्यासाठी येतात. त्याची नोंद भोर पोलिसांकडे नाही. यामुळे दिवसभर विक्रीच्या निमित्ताने शहरातील विविध गल्ल्यांत जायचे आणि बंद घरांची टेहळणी करुन रात्रीच्या वेळी चोरी करण्याचे प्रकार सतत सुरु आहेत. मग नाईट राऊंडला जाणाऱ्या पोलिसांना व अधिकाऱ्यांना चोरी कधीच सापडत नाही. आणि विशिष्ट दिवशीच 

टॅग्स :bhor-acभोरtheftचोरीThiefचोरHomeघर