शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी उद्या लोटणार भीमसागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 20:07 IST

गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण परिसारात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.  

ठळक मुद्देसोहळ्याची तयारी पूर्ण : विजयस्तंभाला फुलांची आकर्षक सजावट फुल सजावटकेंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले,यांच्यासह विविध नेत्यांच्या सभांचे आयोजन गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात ‘एक स्तंभ एक व्यासपीठ‘ संकल्पना राबविणार

कोरेगाव भिमा :  भीमानदीकाठावरील कोरेगाव भीमा जवळील ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. मानवंदना सोहळ्यास महाराष्ट्रासह देशभरातून उद्या ( मंगळवारी)  लाखो आंबेडकरी बांधव येणार आहेत. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण परिसारात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.  कोरेगाव भिमाजवळ भीमानदीकाठी एक जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्यासैन्यात घनघोर लढाई झाली. यात महार बटालियनच्या ५०० शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजिमेंटच्या अनेक शुरवीरांना हौताम्य आले. या धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ  भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. १९२७ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह  देशभरातून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागली.      सोमवारपासूनच (दि ३१) विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी मोठ्याप्रमाणात नागरिक येत आहेत. सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. उद्या मंगळवारी मानवंदना दिल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम,  दलित कोब्राचे प्रमुख अ‍ॅड. भाई विवेक चव्हाण यांच्या स्तंभ परिसरात सभा होणार आहेत.   ऐतिहासिक ६५ फुटी विजयस्तंभला आकर्षक फुलांची सजावट करण्याचे काम भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, सचितानंद कडलक, भाऊसाहेब भालेराव, विशाल सोनवणे, सागर गायकवाड, प्रविण म्हस्के आदी करत आहेत. स्तंभ परिसरात मानवंदनेसाठी येणा-या बांधवांना अन्नदानही करण्यात येणार आहेत.   पेरणे ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य पथक, फिरते स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहेत. या बरोबरच या ठिकाणी सौरदिवेही बसवण्यात आल्याचे सरपंच रुपेश ठोंबरे व ग्रामविकास अधिकारी नंदकुमार चव्हाण यांनी सांगितले.   ....................विजयस्तंभाला फुलांची आकर्षक सजावट  ऐतिहासिक ६५ फुटी विजय स्तंभाची फुलांनी सजावट करण्यात आली आहे.  स्तंभ परिसरात बुक स्टॅल, मानवंदनेसाठी येणा-या भाविकांसाठी अन्नछत्र उघडण्यात आले आहेत.  यावर्षीही ‘एक स्तंभ एक व्यासपीठ‘ या संकल्पेचा आग्रह धरत सर्वच पक्षनेत्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले. 

...........

कोरेगाव भीमात दोन हजार पोलिसांचे संचलन गावातुन फेरी : हातात  बंदुक, काठ्या घेत संचलन कोरेगाव भिमा : कोरेगाव भीमा परिसरात १ जानेवारी २०१८ ला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी परिसरात मोठा फौजफाटा लावला असतानाच आज पुणे-नगर महामार्गावरुन पोलिसांचे संचलन करत असतानाच संपुर्ण गावातुनही संचलन करण्यात आले आहे . कोरेगाव भीमा परिसरात १ व २ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रशासनाने कमालीची सतर्कता बाळगली आहे. कोरेगाव भीमामध्येच दोन हजारांपेक्षा जास्त पोलीस फौजफाटा , वरुन व वज्र वाहने , अग्निशमन बंब , राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या तैनात आहेत. गावांमधुन सामाजिक सलोखा जपण्यासाठी प्रत्येक चौकात, वस्तीवर एक अधिकारी १० कर्मचारी तैनात आहेत.कोरेगाव भीमा, पेरणे व वढु बुद्रुक याठिकाणी २७ डिसेंबर पासुनच पाच हजारांपेक्षा जास्त पोलीस बंद दिला आहे. या पोलीसांचे गावोगाव संचलन कालपासुन सुरु करण्यात आले आहे. या पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या सुचनेप्रमाने घेण्यात आलेल्या या संचलनामध्ये उपअधिक्षक कोल्हापुर सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा धीरज पाटिल, उविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरसागर, किशोर काळे,  शिक्रापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर, २० पोलीस निरीक्षक, ४० पोलीस उपनिरीक्षक, ८०० जिल्हा पोलीस, ४०० होमगार्ड व राज्य राखीव पोलीस दलाच्या सात तुकड्यांमधील जवान सहभागी झाले आहेत. 

...........कोरेगाव भीमा परिसरात उभारल्या ४ पोलीस चौक्याचोख बंदोबस्त : सणसवाडी, वढू, पेरणे, रांजणगाव गणपती येथे पोलीस चौक्याभीमा, सणसवाडी येथेही अशाच चौक्या बनवायला सांगून त्या सर्व चौक्यांचे औपचारिक उद्घाटन नुकतेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.ही पोलीस चौकी पूर्ण अग्निरोधक, साधारण १२ फूट रुंद व २० फूट लांब तसेच ९ फूट उंचीची असून तीत फॅन, अधिकारी-कर्मचारी व नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या अशी व्यवस्था आहे. ........................एक वर्षानंतरही आम्हाला न्याय नाहीआरोपी अद्यापही मोकाट : दंगलीतील मृत राहुल फटांगडे कुटुंबीयांनी व्यक्त केली व्यथा गेल्यावर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमा-सणसवाडी (ता. शिरूर) परिसरात झालेल्या दंगलीमध्ये राहुल फटांगळे या तरुणाला नाहक जीव गमवावा लागला होता. दंगलीनंतर आमच्या कुटुंबीयांना कोणीही भेट तर दिली नाहीच, शिवाय पोलीस प्रशासनाला सीसीटीव्ही फुटेज मिळूनही अद्याप दोन आरोपी पकडले गेले नसल्याने आम्हाला न्याय मिळाला नसल्याची भावना मृत राहुल फटांगळे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. दरम्यानच्या काळामध्ये दंगलीमधील मृत राहुल फटांगळेच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने पंधरा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. यावेळी काही संघटनांनी जास्त मदत मिळावी, अशी मागणी केली होती. परंतु फटांगळे कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्यात आली. त्यांनतर कुठल्याही प्रकारची मदत या कुटुंबीयांना मिळाली नाही....................            भीमसैनिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागतग्रामस्थ सरसावले : पाणी, अल्पोपाहाराचेही केले वाटपगतवर्षी कोरेगाव भीमा व सणसवाडी या ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे मानवंदनेसाठी येणाºया समाजबांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कोरेगाव भीमा व परिसरावर बसलेला हा डाग पुसण्यासाठी स्थानिक नागरिक मानवंदनेसाठी येणाºया समाजबांधवांचे गुलाबपुष्प, पाणी आणि अल्पोपहार देऊन स्वागत करीत असल्याने परिसरात सामाजिक ऐक्याची भावना जागृत होण्यास मदत मिळाली आहे.................. 

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPoliceपोलिसRamdas Athawaleरामदास आठवलेcollectorजिल्हाधिकारी