विजयस्तंभ अभिवादनास आज लोटणार भीमसागर; कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:12 AM2020-01-01T05:12:12+5:302020-01-01T07:04:22+5:30

अनुचित घटना टाळण्यासाठी सुमारे १० हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Bhimsagar will be celebrated today | विजयस्तंभ अभिवादनास आज लोटणार भीमसागर; कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

विजयस्तंभ अभिवादनास आज लोटणार भीमसागर; कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

googlenewsNext

कोरेगाव भीमा (जि. पुणे) : भीमाकाठावरील कोरेगाव भीमानजीक ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष, संघटना आणि मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून १ जानेवारीला भीमसागर लोटणार आहे. विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी सुमारे १० हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी १ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली. यात महार बटालियनच्या ५०० सैनिकांनी पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. त्यात महार रेजिमेंटच्या अनेक सैनिकांना वीरमरण आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. १९२७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव १ जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले.

बुधवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) रामदास आठवले, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे आनंदराज आंबेडकर, भारतीय दलित कोब्राचे अ‍ॅड. भाई विवेक चव्हाण, रिपब्लिकन जनशक्तीचे अर्जुन डांगळे, समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्षा मीरा आंबेडकर, भीमराव आंबेडकर, भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम, रिपब्लिकन युवा मोर्चा, भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र क्रांतिसेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, क्रांती मजदूर पुणे शहर, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवासंघ, भीमशक्ती युवा सेना यांच्या येथे सभा होणार आहेत.
 

Web Title: Bhimsagar will be celebrated today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.