शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक अवैध, विशेष न्यायालयाचा पुणे पोलिसांना 'दे धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 17:07 IST

मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेंना अटक करण्यात आल्या. त्यानंतर, पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना पुण्याला नेले

पुणे- भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना पुणेपोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली होती. पुण्यातील सत्र न्यायालयानं काल त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, ही अटक अवैध असल्याचं विशेष न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईला मोठा धक्का बसलाय. 

मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेंना अटक करण्यात आली. त्यानंतर, पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना पुण्याला नेले असून, आज न्यायालयात हजर करून त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात येत होती. मात्र, येथील विशेष न्यायालयाने ही अटक अवैध असल्याचं म्हटलंय. पुणे पोलिसांना हा मोठा धक्का असून लवकरच तेलतुंबडेंची सुटका होण्याची शक्यता आहे.  

पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र 'मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही', असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. त्यांच्या बाजूने रोहन नहार यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना 4 आठवड्यांचे संरक्षण दिले असताना, ही अटक म्हणजे न्यायालाचा अवमान आहे, असे विशेष न्यायालयाने म्हटले आहे. तसेच हे संरक्षण 11 फेब्रुवारीपर्यंत कायम असल्याचेही न्यायलयाने स्पष्ट केले.

जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी यास विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 4 आठवड्यात योग्य न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करता येत होता. ज्यादिवशी त्यांनी हा अर्ज केला तेव्हाच, हे संरक्षण संपले. हा अर्ज फेटाळल्याने पोलिसांना अटक करता आली. त्यांनी अर्ज केला नसता तर पोलिसांनीही अटक केली नसती, असा युक्तिवाद उज्ज्वला पवार यांनी केला. परंतु, विशेष न्यायालयाने तेलतुंबडे यांची अटक अवैध ठरवली.  

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसAirportविमानतळBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार