शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

काेरेगाव भीमा असणार सीसीटिव्ही निगराणीखाली ; पाेलीस करणारा छुप्या कॅमेरांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 15:37 IST

काेरेगाव भीम शाैर्यदिनासाठी प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांच्या साेयिसाठी प्रशासनाकडून चाेख बंदाेबस्त करण्यात आला आहे.

पुणे : काेरेगाव भीमा येथे गेल्या वर्षी 1 जानेवारी राेजी झालेल्या जातीय दंगलीच्या जखमा अजूनही भरल्या नसल्याने तसेच या दंगलीची पुनरावृत्ती हाेऊ नये यासाठी पाेलीस प्रशासनाबराेबर जिल्हाप्रशासन सज्ज झाले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच काेणीही कार्यक्रमात व्यत्यय आणू नये यासाठी हा संपूर्ण परिसर कॅमेरांच्या निगराणीखाली असणार आहे. त्याचबराेबर पाेलिसांकडून छुप्या कॅमेरांचा देखील वापर करण्यात येणार असून त्याद्वारे अनुचित हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.     यंदा काेरेगाव भीमा शाैर्यदिन शांततेत पार पडावा यासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे. माेठी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययाेजनांची माहिती काेल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक विश्वास नांगरेपाटील, पुणे जिल्हाधिकारी नवलकिशाेर राम आणि पुणे ग्रामीण पाेलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

असा असणार बदाेबस्त 

- विजयस्तंभाचा परिसर हा 500 सीसीटिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून निगराणीखाली असणार आहे. त्याचबराेबर 40 व्हीडीओ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणांचे चित्रीकरण येणार आहे. 

- यंदा पहिल्यांदाच 12 ड्राेन कॅमेरांचा देखील वापर करण्यात येणार आहे. यातील 6 ड्राेन कॅमेरे हे हवेली भागात आणि 6 ड्राेन कॅमेरे शिरुर भागाची निगराणी करणार आहेत. त्याचबराेबर यंदा 50 हेल्मेट कॅमेरे आणि 50 छुप्या पेनामध्ये लावण्यात येणाऱ्या कॅमेरांचा देखील वापर निगराणीसाठी करण्यात येणार आहे. - ज्यांचा शांतता भंग केल्याचा इतिहास आहे आणि जे दंगलीमध्ये प्रत्यक्ष , अप्रत्यतक्षरित्या सहभागी हाेते अशा 1211 लाेकांवर विविध कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच 15 नाेव्हेंबरपासून साेशल मिडीयावर लक्ष ठेवून 45 जणांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. 

- अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या साेयिसाठी 35 हेल्प डेस्क असणार. 

- 25 रुग्णवाहिका, 5 कार्डीयाक रुग्णवाहिका डाॅक्टरांच्या टीम साेबत तैनात असणार. 200 वाॅटर टॅंकर, 300 स्वच्छता गृहे, 23 फायर ब्रिगेडच्या गाड्या, 16 क्रेन तैनात असणार. त्यातबराेबर 270 फायर बलूनचा सुद्धा वापर करण्यात येणार. जवळच्या रुग्णालयातील 10 टक्के बेड आरक्षित करण्यात आले आहेत. 

- चारचाकी आणि दुचाकीसाठी 50 हजार क्षमात असणारी 11 वाहनतळे. त्याचबराेबर वाहतळ ते विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी 200 शटल बसेसची व्यवस्था.   - खबरदारी म्हणून 1 जानेवारीला परिसरातील वीज प्रवाह खंडीत करण्यात येणार आहे. तसेच या परिसरातील इंटरनेट सेवा बंद असणार आहे. 

वाहतूकीतील बदलपाेलीस प्रशासनाकडून कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांच्या साेयीसाठी 31 -12-2018 राेजी रात्री 10 वाजल्यापासून ते 1-1-2019 राेजी रात्री 12 वाजेपर्यंत ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात येणार आहे. 

- अहमदनगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने ही शिक्रापूर येथून चाकणकडे वळविण्यात येणार आहेत. 

- अहमदनगरकडून हडपसरकडे येणारी वाहने ही शिक्रापूर- तळेगांव ढमढेरे- न्हावरा- केडगांव चाैफुला- साेलापूर हायवे मार्गे हडपसरकडे वळविण्यात येणार आहेत. 

- पुण्याकडून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने ही चाकण मार्गे किंवा खराडी बायपास येथून हडपसर- साेलापूर हायवे, केडगांव चाैफुला मार्गे अहमदनगरकडे वळविण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणेPoliceपोलिसVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील