शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

भांडारकर संस्थेची ई-लायब्ररी होणार खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 2:55 AM

मूर्त स्वरूप प्राप्त : वाचकांना फायदा

पुणे : शताब्दी वर्षाच्या निमित्ताने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘ई-लायब्ररी’ प्रकल्पाला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. नियमित वापरामुळे जीर्ण व दुर्मिळ अशी एक हजार पुस्तके संस्थेच्या संकेतस्थळावरील ‘ई-लायब्ररी’मध्ये उपलब्ध करून दिली आहेत. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते बुधवारी (दि. १९) संस्थेच्या ई-लायब्ररीचे उद्घाटन होणार आहे. ‘वेरूळ-एक अद्भूत शिल्प’ या विषयावर देगलूरकर यांचे व्याख्यान होणार आहे.

विविध विषयातील ज्ञानशाखांचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या जगभरातील वाचकांना पुस्तके वाचता येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भांडारकर संस्था व डायमंड पब्लिकेशन्सतर्फे भरविण्यात येणाºया पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते बुधवारी सकाळी दहा वाजता होणार असून, महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या टाटा सभागृहामध्ये २६ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे, असे भूपाल पटवर्धन आणि दत्तात्रय पाष्टे यांनी सांगितले.पाच हजार पुस्तके‘मुलाखतकाराची मुलाखत’ या कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांची २१ डिसेंबर रोजी मुलाखत होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल २६ डिसेंबर रोजी डॉ. अरुणा ढेरे यांचा संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांच्या हस्ते ढेरे यांचा सत्कार करणार असून, ढेरे यांचे व्याख्यान होईल. विविध विषयावरील ५ हजार पुस्तके उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :libraryवाचनालयPuneपुणेbhandarkar institute puneभांडारकर संशोधन संस्था, पुणे