शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना १ जानेवारी सुरु होणार; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 20:21 IST

अनेक अडचणींवर मात करीत व शासनाच्या २२ विभागांच्या मान्यतेनंतर ५८३ कोटी रूपयांचा हा प्रकल्प आजमितीला झाला पूर्ण

ठळक मुद्देयावेळी जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, माजी आमदार उपस्थित

पुणे : शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चे लोकार्पण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी होणार आहे. १ जानेवारी २०२१ रोजी या प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी चार वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण, वने व माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, माजी आमदार उपस्थित असतील. 

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सभागृहातील उपस्थिती मर्यादित ठेवण्यात आली असून, या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या लॉनवर करण्यात येणार असल्याचेही महापौर मोहोळ यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह सर्व गटनेते व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

सन २०१३ मध्ये मंजूर झालेल्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चे काम सन २०१४ मध्ये सुरू झाले. अनेक अडचणींवर मात करीत व शासनाच्या २२ विभागांच्या मान्यतेनंतर ५८३ कोटी रूपयांचा हा प्रकल्प आजमितीला पूर्ण झाला आहे. २०० दशलक्ष लिटर प्रति दिन पाणी या प्रकल्पामुळे शहराच्या पूर्व भागातील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, वडगावशेरी या परिसरातील नागरिकांना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहराला एक नवीन जलस्त्रोत जोडला गेला आहे.    -----------------------------------

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAjit Pawarअजित पवार