शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भादलवाडीची पाणीपातळी घटली!

By admin | Updated: April 3, 2015 03:18 IST

भादलवाडी (ता. इंदापूर) येथील तलावामधील पाणीपातळीत घट होत आहे. याचा परिणाम शेती, मत्सव्यवसाय व पक्ष्यांच्या विणीच्या हंगामावर झाला आहे

पळसदेव : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील तलावामधील पाणीपातळीत घट होत आहे. याचा परिणाम शेती, मत्सव्यवसाय व पक्ष्यांच्या विणीच्या हंगामावर झाला आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी, विंधन विहिरी, तलाव यामधील पाणीपातळीत घट झाल्याने खऱ्या अर्थाने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातच विजेचे भारनियमन वाढल्याने शेतांमधील पिकांना फटका बसला आहे. तलावात सध्या अत्यल्प पाणीसाठा आहे. पिकांना दिवसाआड पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याचा उपसाही मोठ्या प्रमाणावर होतो. मागील तीन-चार महिन्यांपूर्वी तलावात अल्पप्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर खडकवासला कालव्याच्या आवर्तनामधून पाणी आलेले नाही. सध्या तलावात छोटे मासे आहेत. आगामी काळात तलावामध्ये पाणी न सोडल्यास माशांची वाढ होणार नाही. परिणामी तलावातील मासे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पाण्याअभावी चित्रबलाक पक्ष्यांच्या वसाहतीलाही धोका निर्माण झाला आहे. जलसंपदा खाते प्रत्येक आवर्तनावेळी भादलवाडी तलावात पाणी सोडण्यास टाळाटाळ करते. या तलावावर भादलवाडी, डाळज, पिलेवाडी येथील शेतकऱ्यांची हजारो एकर शेती अवलंबून आहे. पाणीपातळी घटली असताना या तलावामध्ये पाणी का सोडले जात नाही, असा सवाल होत आहे.